Tarun Bharat

सोलापूर महापालिकेच्या 7 समित्यांच्या 63 सदस्यांची बिनविरोध निवड

Advertisements

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या महिला व बालकल्याण समितीसह सात विशेष समित्यांच्या 63 सदस्यांची निवड मंगळवारी बिनविरोध करण्यात आली. यासंदर्भातील प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. यावेली पहिला प्रस्ताव समित्यांच्या सदस्य निवडीचा मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. सभागृहातील संख्याबळानुसार भाजपाच्या चार, शिवसेना दोन, काँग्रेस, एमआयएम प्रत्येकी एक आणि राष्ट्रवादी बसपा यांच्या मधून एक अशा सदस्यांची नावे सभागृहापुढे आली होती. या नावांना चर्चेअंती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मंजुरी दिली. सदरच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार असून या समित्यांवर सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडून तारीख निश्चित होऊन मिळणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी दिली.

विविध समित्या आणि निवड झालेले सदस्य पुढील प्रमाणे.

-महिला व बाल कल्याण समिती : कल्पना कारभारी, सुरेखा काकडे, प्रतिभा मुदगल, वरलक्ष्मी पुरुड (भाजपा), मिराबाई गुर्रम, विनायक कोंड्याल (शिवसेना), परविन इनामदार (काँग्रेस), तसलीम शेख (एमआयएम), ज्योती बमगुंडे (वंचित बहुजन आघाडी)

-स्थापत्य समिती : राजश्री कणके, रवी कैयावाले, नागेश भोगडे, श्रीनिवास रिकमलले (भाजपा), विठ्ठल कोटा, मनोज शेजवाल (शिवसेना), अनुराधा काटकर (काँग्रेस), पूनम बनसोडे (एमआयएम), किसन जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)

-शहर सुधारणा समिती : नारायण बनसोडे, विजयालक्ष्मी गड्डम, राजश्री बिराजदार पाटील, मेनका राठोड (भाजपा), भारतसिंग बडूरवाले, राजकुमार हंचाटे (शिवसेना), प्रवीण निकाळजे (काँग्रेस), शहाजीदाबानो शेख (एमआयएम), आनंद चंदनशिवे (वंचित बहुजन आघाडी)

-वैद्यकीय व आरोग्य समिती : डॉ. किरण देशमुख, डॉ. राजेश आनगिरे, अविनाश पाटील, संगीता जाधव (भाजपा), अनिता मगर, गुरुशांत दुत्तरगावकर (शिवसेना), फिरदोस पटेल (काँग्रेस), वाहिदाबी शेख (एमआयएम), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)

-मंड्या आणि उद्यान : अविनाश बोमड्याल, निर्मला तांबे, रामेश्वरी बिरू, मीनाक्षी कंपली (भाजपा), प्रथमेश कोठे, मंदाकिनी पवार (शिवसेना), तौफिक हत्तुरे (काँग्रेस), नूतन गायकवाड (एमआयएम), रमेश पुजारी (वंचित बहुजन आघाडी)

-विधी समिती : अंबिका पाटील, देवी झाडबुके, नागेश वल्याळ, अश्विनी चव्हाण (भाजपा), देवेंद्र कोठे, ज्योती खटके (शिवसेना), विनोद भोसले (काँग्रेस), वाहिदाबानो शेख (एमआयएम), सुवर्णा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)

-कामगार व समाजकल्याण समिती : अनिता कोंडी, मंगल पातळे, विनायक विटकर, सोनाली मुटकेरी (भाजपा), सारिका पिसे, उमेश गायकवाड (शिवसेना), नरसिंग कोळी (काँग्रेस), अजहर हुंडेकरी (एमआयएम), सुनिता रोटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

Related Stories

कोरोनामुक्त रुग्ण विठुनामाच्या घोषात घरी परतले

Abhijeet Shinde

अक्कलकोट शहर – तालुक्यात आज ७ कोरोना रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना करावी लागणार चार महिन्यांची प्रतिक्षा

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा तालुक्यात ९५ नवे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

Shivaji University Election : विकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल

Archana Banage

कोरोना रुग्णाना व संपर्कातील लोकांना योग्य सुविधा द्या : संजय देशमुख

Abhijeet Shinde
error: Content is protected !!