Tarun Bharat

सोलापूर : महिंसगाव येथे चोरट्याने केला ६२ हजारांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

बेडरुमचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ६२ हजारांच्या ऐवज लंपास केला. ही घटना दि. ४ रोजीच्या रात्री महिंसगाव ता. माढा येथे घडली. संदीप अंबादास खारे यांनी या घटनेची फिर्याद कुर्डुवाडी पोलिसांत दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी खारे व त्याचे कुटुंबीय हे दि.४ रोजी रात्री १० वा. जेवण करुन फिर्यादीची आई व मुले घरात तर फिर्यादी व त्याची पत्नी घराच्या स्लॅबवर झोपले होते.

दरम्यान चोरट्यांनी आई व मुले झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लाऊन बेडरूमचे कुलुप तोडून कपाटातील अडीच तोळे वजनाचे ३७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण,२० हजाराचा सॅमसंगचा मोबाइल व ५ हजाराचा विवो कंपनीचा मोबाइल असा एकूण ६२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.खारे यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर जी.आय.मानांकनासाठी हालचाली

Abhijeet Khandekar

पूर्ववैमनस्यातून तिहेरी खून; सांगली जिल्हा हादरला

Archana Banage

सोलापूर : डॉ. अश्विनी वाकडे यांची यशाला गवसणी

Archana Banage

१२ ब्रास वाळुसह ३० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

सोलापूर शहरात 40 कोरोना पॉझिटिव्ह,दोन रुग्णांचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर : घरफोड्या करणार्‍या चोरट्यांना अटक ; एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage