Tarun Bharat

सोलापूर : महिला पोलीस आत्महत्या प्रकरणी दोन दिवसानंतर गुन्हा नोंद

प्रतिनिधी / सोलापूर 

कर्तव्यावर असताना अज्ञात कारणावरून विष प्राशन करून महिला पोलिसाने बुधवारी आत्महत्या केली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंद झाली आहे. याप्रकरणी दोन दिवसात गुन्हा दाखल होणार आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बारनिशी पोलीस शिपाई अमृता रमेश पांगरे (वय ३८ रा. लक्ष्मी नगर बाळे सोलापूर) या काम पहात होते. बुधवारी दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्या उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलुर येथील बस स्थानकाजवळ बेशुध् स्थितीत आढळून आल्या होत्या.

त्यांना सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तेथून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मयत पोलीस शिपाई अमृता पांगरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. तालुका पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मयत नोंद करण्यात आली आहे. महिला पोलीस शिपाई अमृता पांगरे यांच्या आत्महत्येप्रकरणी नातेवाईक फिर्याद देतील. त्या प्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल. नातेवाईक दोन दिवसानंतर फिर्याद देणार आहेत.

Related Stories

‘एसटी महामंडळास 2 हजार कोटी आर्थिक सहाय्य करावे’

Archana Banage

अक्कलकोट : भक्तांविना गुरुपौर्णिमा संपन्न

Archana Banage

सोलापूर विद्यापीठात उभारणार अहिल्यादेवींचा 15 फूटांचा अश्वारुढ पुतळा

Archana Banage

सरकार विरुद्ध पुकारलेल्या युद्धात करो या मरो – कॉ. नरसय्या आडम मास्तर

Archana Banage

बार्शीतील कासारी येथे रेशन मोफत धान्य वाटले नसल्याची तक्रार

Archana Banage

सोलापूर : मोदीजी मदत करणार आहेतच ; उद्धवजी शेतकऱ्यांना गतवर्षीप्रमाणे आकस्मिक निधीतून मदत करा..!

Archana Banage
error: Content is protected !!