Tarun Bharat

सोलापूर : माघ एकादशीला संचारबंदी पण एसटी सुरळीत

यात्रा रद्द; दोन दिवस विठ्ठलाचे मुख दर्शनही बंद

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱया सावळया विठोबाचा माघ एकादशीचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत आहे. एकादशी दिवशी पंढरीत लाखोंची गर्दी होउ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी पंढरपूर शहरासह तालुक्यातील दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. तर याकाळात एसटी सेवा मात्र सुरळीत सुरू असणार आहे.

माघ एकादशीला पंढरपूर शहरासह शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे, भटुंबरे अशा 10 गावात संचारबंदी 24 तासांसाठी फ्ढक्त एकादशीला लागू असणार आहे. यामुळे पंढरपूरची माघी यात्रा पूर्णपणे प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी जरी असली. तर तातडीची तसेच प्रवासी वाहतुक सुरू ठेवण्याबाबतचे आदेश आहेत. त्यामुळे एसटी सेवा जरी सुरू राहीली. तरी केवळ पंढरपूरातील स्थानिक लोकांना यांचा फ्ढायदा होणार आहे. भाविकांना एसटीतून पंढरपूरला येता येणार नाही.  तसेच शहरात दूरवरचे ठिकाण निश्चित करुन एसटी सेवेतील प्रवासी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत.

माघ एकादशी पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मंदिर समितीकडून 22 आणि 23 फेब्रुवारी असे दोन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन सामान्य भाविकांना पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. तसेच माघी वारीसाठी पंढरपूर कडे येणाऱया पायी दिडÎांना अटकाव करणे. शहरातील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांना वास्तव्य करू न देणे, असेही आदेश यानिमित्ताने पारित झाले आहे.

Related Stories

विषारी घोणसच्या दंशाने उपचारापुर्वीच महिलेचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर : मंगळवेढ्यात कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ

Archana Banage

सुशीलकुमार शिंदेंच्या बॅनरवर शाई अन् दगडफेक

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात उत्पादित ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठीच

Archana Banage

काँग्रेसने शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं : चंद्रकांत पाटील

prashant_c

वंचित बहुजन आघाडी बार्शीतील सर्व ग्रामपंचायत लढवणार

Archana Banage