Tarun Bharat

सोलापूर : माढा तालुक्यात २७ कोरोना बाधितांची भर

Advertisements

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच असून आज आणखी २७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यातील बाधितांचा आकडा एकूण २३० झाला आहे. त्याचबरोबर ८१ जणांचा अहवाल प्रलंबित असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
माढा तालुक्यातील बाधितांची संख्या वरचेवर वाढत असून आज माढा येथे २९ अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये एकूण १४ पॉझिटीव्ह आढळल्याने माढ्यासाठी ही मोठी चिंताजनक बाब आहे. तसेच कुर्डुवाडी येथील ५ व मोडनिंब येथील १ व्यक्ती अॅन्टीजेन टेस्ट मध्ये पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. तर रांझणी येथील ३,रिधोरे येथे २, पापनस येथे १, भोसरे येथे १,असे एकूण २७ जण आज कोरोनाबाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला आहे.|

कुर्डुवाडी येथे दि. २७ नंतर आजपर्यंत एकही बाधित रुग्ण नव्हाता परंतू आज नव्याने ५ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांच्या व प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली. आज आलेल्या बाधितांसह माढा तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या २३० झाली आहे. वरील बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तालुका आरोग्य प्रशासनाकडून व ग्रामीण रुग्णालयाकडून घेतली जात आहे. सदर बाधित व्यक्तींचा राहता परिसर संबंधित प्रशासनाकडून कन्टेन्मेंट झोन म्हणून प्रतिबंधित करण्यात आला आहे.

Related Stories

कोल्हापूर : आकुर्ळ जंगलात बंदुकीने डुकराची शिकार, वनविभागाच्या निदर्शनात येताच शिकारी पसार

Abhijeet Shinde

…तर सेना दुर्बिणीने शोधावी लागेल

datta jadhav

शेतमजूर भूमिहीन व छोट्या कुटीर उद्योगांना भरीव अनुदान द्या

Abhijeet Shinde

सांगली : बिळाशीतील महिलेचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

खंडपीठ स्थापनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

Sumit Tambekar

मंत्रीमंडळ विस्तार…आषाढीनंतर

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!