Tarun Bharat

सोलापूर : माढा तालुक्यात ४८ जण कोरोना बाधित

आमदारांच्या गावात १३ रुग्ण तर टेंभुर्णी येथे १५


प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १५ गावांत एकूण ४८ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कुर्डुवाडी, माढा, धानोरे, विठ्ठलवाडी, बेंबळे, व्होळे, निमगांव टें,अंबाड, टेंभुर्णी, अकोले खु, सापटणे टें, रूई, मानेगाव, भोसरे ,भुताष्टे येथे हे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

तालुक्यात एकूण २१४ पैकी ११८ अॅन्टीजेन व ९६ तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी कुर्डुवाडी येथे २, माढा येथे २,धानोरे येथे ४,विठ्ठलवाडी येथे १, बेंबळे येथे २,व्होळे येथे १,निमगांव टें येथे १३,अंबाड येथे १, टेंभुर्णी येथे १५ ,अकोले खु येथे २, सापटणे टें येथे १, रूई येथे १, मानेगाव येथे १, भोसरे येथे १,भुताष्टे येथे १ जण असे एकूण ४८ जण कोरोनाबाधित असल्याचे अहवालात समोर आले आहे.तर १० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

संपूर्ण अहवालात निंमगाव टें व टेंभुर्णी येथे अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. निंमगाव टें हे आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांचे गाव असून याठिकाणी ते वास्तव्यास आहेत. आमदारांच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन याबाबत योग्य ती काळजी घेते की नाही याबाबत नागरिकांतून साशंकता निर्माण झाली आहे आमदारांच्या गावात जर ही स्थिती असेल तर उर्वरित तालुक्यात काय परिस्थिती असेल हे यावरून लक्षात येत आहे तरी नागरिकांनी स्वतः हून काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

Related Stories

सोलापुरच्या गुरुजींचा पालकमंत्री भरणे यांनी केला सत्कार

Archana Banage

ताडोबा सफारीसाठी गेलेल्या महिला पर्यटकाचा मृत्यू

prashant_c

लऊळ शिवारातील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

Archana Banage

सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चा; कोणत्याही परिस्थितीत निघणारच

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागात 108 कोरोना पॉझिटिव्ह, 6 जनांचा मृत्यू

Archana Banage

ठाकरे-फडणवीस यांच्यातील कलगीतुऱ्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

Archana Banage