Tarun Bharat

सोलापूर : माढा तालुक्यात ९५ नवे कोरोनाबाधित

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यात बुधवार दि.७ रोजी तालुक्यातील ३१ गावात रुग्णांसह एकूण ९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मोडनिंब व धानोरे येथील एक पुरूषाचा मृत्यू झाला असल्याचे तालुका वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तांदुळवाडी ,मानेगाव,वडाचीवाडी तम, उपळाई खु, भुताष्टे,जाधववाडी मो, परितेवाडी, उपळवटे, चोभेपिंपरी, दहिवली, नगोर्ली, सापटणे भो येथे १, खैराव बावी, वरवडे, अकोले खु ,कुर्डुवाडी येथे प्रत्येकी २,कुंभेज,,उपळाई बु, परिते, व्होळे, माढा वडोली येथे प्रत्येकी ३, रिधोरे , लऊळ येथे प्रत्येकी ४, भोसरे येथे ५, अंबाड येथे ७, टेंभुर्णी येथे ९, धानोरे , कुर्डू येथे प्रत्येकी ११ असे एकूण ९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली असून नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. गरजे शिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये. गेली दोन दिवस लसीकरणाचा तुटवडा असून लस उपलब्ध होताच नागरिकांना लसीकरण करुन घेणे आवश्यक बनले आहे.

Related Stories

सोलापूर शहरात 40 कोरोना पॉझिटिव्ह, एक मृत्यू

Archana Banage

शहरात 49 तर ग्रामीणमध्ये 16 जणांना बाधा

Archana Banage

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी निर्यातक्षम केळी – पीक परिसंवाद

Archana Banage

सोलापुरात आज 49 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर : उजनीच्या कालव्यातून पाणी सोडा – भगीरथ भालके

Archana Banage

कोरोनाबाधित रूग्णांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक सेवाभावी संस्थांचा पुढाकार

Archana Banage