Tarun Bharat

सोलापूर : मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित करा,अन्यथा आंदोलन

प्रतिनिधी / सोलापूर

तुम्ही चार लग्न करता, त्यामुळे तुमचे जॉइंट खाते उघडणार नाही असे वक्तव्य करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या त्या अधिकाऱ्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा आम्ही निषेध करतो, त्या अधिकाऱ्याला पदावर राहणे योग्य नाही, तातडीने निलंबित करा व  दोन दिवसात माफीनामा जाहीर करा अन्यथा बँक ऑफ महाराष्ट्र समोर एमआयएमच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी मंगळवारी दिला.

काही दिवसांपूर्वी सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एका मुस्लिम युवक जॉइंट खाते उघडण्यास गेले होते. मात्र येथील अधिकाऱ्याने तुम्ही  चार लग्न करता यामुळे जॉइंट खाते उघडणार नाही असे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वत्र नाराजी सुरू झाली आहे. याविषयी एमआयएमचे शहराध्यक्ष म्हणाले, बँकेचे अधिकारी, कर्मचारी शिक्षित असतात,बँकेमध्ये सर्व समाजाचे माणसे येतात, बँकेवर इतका विश्वास असतो की घरात पैसे ठेवत नाहीत मात्र बँकेत ठेवतात. मात्र मुस्लिम धर्मीय आहे म्हणून टारगेट करून बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिकाऱ्याने मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. मुस्लिम समाजाच्या आस्थावर ठेस पोहोचवण्याचे काम होत आहे.  ही धक्कादायक बाब असून आम्ही ते खपवून घेणार नाही. 

उद्या दुसऱ्या समाजावर बोलेलं, या अधिकाऱ्याच्या मनात मुस्लिम समाजाच्या विरोधात नफरत पसरली आहे. त्या  अधिकाऱ्याला पदावर राहणे योग्य नाही. त्याला निलंबित करा व माफीनामा जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शाब्दी यांनी दिला. 

Related Stories

विविध मागण्यांसाठी बार्शी – लातूर मार्गावर रस्ता रोको

Archana Banage

MPSC EXAM : करमाळा आगाराने विद्यार्थ्यांसाठी केली जादा बसेसची सुविधा

Archana Banage

तज्ञ डॉक्टरांची समिती सोलापुरात दाखल

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 215 कोरोनामुक्त

Archana Banage

`एनटीपीसी’मध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा करणे शक्य

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागाला दिलासा

Archana Banage