Tarun Bharat

सोलापूर : लातुर शहरातील उच्चभ्रु वस्तीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश

प्रतिनिधी / लातूर

लातूर शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील कम्युनिटी हॉलच्या पाठीमागे असलेल्या एका घरामध्ये काही बडे व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून जागा मालकासह 10 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून 1 लाख 55 हजार 850 रूपये रोख जप्त केले आहेत.

याबाबतचे वृत्त असे की, आदर्श कॉलनी कम्युनिटी हॉलच्या पाठीमागे पन्हाळे यांच्या घरामध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी गवारे, कोळसुरे, जाधव यांनी काल सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक यांचे सर्च वॉरंट घेवून जुगार खेळल्या जात असलेल्या पन्हाळे यांच्या घरावर धाड टाकली. तेव्हा त्यांना 9 जण राऊंड करून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्त्याचे 13 बॉक्स किंमत 6 हजार 500 रूपये तसेच रोख रक्कम असा एकूण 1 लाख 55 हजार 850 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 9 व्यक्तीसोबतच जागा मालकावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

या जुगारामध्ये ज्यांच्यावर कारवाई केली अशा विकास उर्फ मुन्ना सुभाष साबदे रा. नारायणनगर लातूर, त्यांच्याकडे मिळालेली रक्कम 10 हजार 300 रूपये, फारूक महमदमिया सय्यद रा. उस्मानपुरा मिळालेली रक्कम 350 रूपये, संभाजी भानुदास शिंदे रा. नित्रुड, ता. माजलगाव रक्कम रूपये 15 हजार 800, पवन रामानुज रांदड रा. हत्तेनगर यांचे मिळालेली रक्कम 26 हजार 500 रूपये, विशाल उर्फ बाबा महिंद्रकुमार राठी रा. कन्हेरी चौक मिळाली रक्कम 27 हजार 500, राजकुमार गोविंद दरक रा. मोतीनगर मिळाली रक्कम 50 हजार 400 रूपये, प्रवीण रामचंद्र कालेकर रा. अग्रसेन भवनजवळ लातूर मिळाली रक्कम 12 हजार 500 रूपये, अन्वर उमर सय्यद रा. प्रकाशनगर लातूर मिळाली रक्कम 1500 रूपये तसेच मनोज शिवाजी पवार रा. आनंदनगर या 9 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय या सर्वांच्या समोर मध्यभागी असलेले रूपये 4 हजार 500 हेही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धाडीमुळे घरामध्ये जुगार अड्डा चालविणार्‍या व्यक्तींचे आता धाबे दणाणले आहेत. या सर्वांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

येरवडा मनोरुग्णालयात अनैसर्गिक कृत्याचा प्रकार

datta jadhav

वैराग नगरपंचायतीचा प्रश्न आता अंतिम टप्यात

Archana Banage

माढा सबजेलमधून चार आरोपींचे पलायन, फिट आल्याचा बनाव

Archana Banage

हातात तलवारी,बंदुका घेत सोशलमीडियावर स्टेटस,दोघांना अटक

Archana Banage

धामणे रोडवर मटका घेणाऱ्या त्रिकुटाला अटक

Tousif Mujawar

गांजा घर घर की कहानी होण्याची वाट बघू नका

Archana Banage