सोलापूर : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील 530 कर्मचाऱ्यांची उद्या, सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून टंकलेखन परिक्षा होणार असल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
टंकलेखन परीक्षा कीर्ती कम्प्युटर, लोकमंगल बँकेच्यावर, आसार मैदान समोर, गोल्डफिंच पेठ सोलापूर येथे होणार आहे. ही परीक्षा ही 7 सत्रामध्ये होणार असून प्रत्येक सत्रामध्ये 75 कर्मचारी टंकलेखनाची परीक्षा देणार आहेत. प्रत्येक सत्र हे 15 मिनिटाचे असणार आहे. दोन सत्रांमध्ये 20 मिनिटांचे अंतर ठेवण्यात आलेले आहे. पहिल्या ग्रुप मधील परीक्षा संपल्यानंतर पुढील ग्रुपची परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्र पूर्णतः सॅनिटाइज करून घेण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे पल्स ऑक्सीमीटरद्वारे spo2 तपासणी, थर्मल स्कॅनिंग थर्मामीटर गन द्वारे चेक करून प्रवेश देण्यात येणार आहे.
लिपिक संवर्गातील कनिष्ठ श्रेणी लिपिक ते कार्यालय अधीक्षक या पदापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना मेसेजद्वारे, व्हाट्सअपद्वारे प्रवेश पत्र पाठवण्यात आलेले आहे. संबंधित खातेप्रमुख यांनीही त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना परीक्षेची वेळ, स्थळ याबाबत व परीक्षेस उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच मनपा नोटीस बोर्डवर आदेश डाकविण्यात आलेले आहेत. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी उद्या, सोमवारी टंकलेखन परीक्षेसाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास आगोदर परीक्षाकेंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


previous post