Tarun Bharat

सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा सोमवारी ऑनलाईन

Advertisements

राज्यपाल कोश्यारी करणार पदवीधारकांना मार्गदर्शन

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या समारंभास सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होत आहे. पदवीधारकांना घरी राहूनच पदवी प्राप्त होणार आहे. विद्यापीठात प्रातिनिधीक स्वरुपात चार विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तर चार विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदव्यांचे वितरण ऑनलाइन पद्धतीने राज्यपाल  कोश्यारी यांच्या हस्ते केले जाणार आहे. प्रत्येक विद्याशाखेतील सीजीपीएनुसार अधिक गुण घेतलेल्या एका विद्यार्थ्यास असे एकूण चार जणांना सुवर्णपदके देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्याशाखेतील प्रथम पीएचडी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात प्रातिनिधिक स्वरूपात पदवी देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. याच समारंभात विद्यापीठाच्या जीवनगौरव व इतर पुरस्कारांचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

यंदा एकूण ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन विद्यापीठाकडून सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये ४५ मुलींचा तर सात मुलांचा समावेश आहे. तर यंदाच्या वषी ५१ जणांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. यामध्ये ३४ विद्यार्थ्यांचा तर १७ विद्यार्थिनींचा समावेश असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शाह यांनी सांगितले. पदवी प्रमाणपत्रासाठी यंदा २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्याचे पिंट विद्यापीठात जमा करावयाचे आहे आहे. पदवीधारकांना https://youtu.be/IzIVViwztSk या युट्युब लिंकवरून दीक्षांत सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही लिंक देण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी बहाल करणारे मान्यवर व पदवी ग्रहण करणाऱ्या स्नातकांना आता बाराबंदीचा गणवेश राहणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक संस्कृती व परंपरा जपणाऱ्या ब्रँडचा विचार करून समितीच्या बैठकीत बाराबंदी गणवेशाचा निर्णय घेतल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. यानुसार राज्यपाल कोश्यारी यांच्यासाठीही बाराबंदीचा गणवेश राजभवनला पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये २१६ पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर : उजनी पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Archana Banage

सोलापुरातील पानगल उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

Archana Banage

सोलापूर शहरात नवे 45 पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

Archana Banage

सोलापुरात 13 नवीन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले – कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 81 वर

Archana Banage

माळीनगर येथे ‘ज्ञानोबा – तुकाराम’ चा नामघोष करत उभ्या रिंगण सोहळ्यात वारकरी रंगले

Kalyani Amanagi
error: Content is protected !!