Tarun Bharat

सोलापूर : विद्यामंदीर संस्थेच्या संचालकांविरोधात फसवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग :

तालुक्यातील वैराग येथील विद्यामंदीर संस्थेच्या संचालकांनी संस्थेला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळविण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन चौकशी करावी, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. सबनीस यांनी दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अरुण भगवान सावंत यांनी याबाबत न्यायालयात खाजगी फिर्याद दिली होती. सावंत यांच्यावतीने ऍड. रविंद्र वैद्य यांनी काम पाहिले.

विद्यामंदीर संस्था ही 1954 साली नोंदणी झालेली असून तिच्या स्थापने वेळचे संचालक सर्व जातीधर्माचे होते. या संस्थेचे विद्यामंदीर प्रशाला, कन्या प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय, पॅरामेडिकल कोर्स, कै. चांगदेवराव घोडके प्रशाला, मालेगाव या शाखा आहेत. दि. 10/09/2015 रोजी संस्थेने सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्ट सादर केला. त्यास नंतर मान्यता मिळाली. संस्थेचे संचालक मृणाल जयंत भूमकर, भूषण जयंत भूमकर, सुवर्णा जयंत भूमकर, प्रेरणा मृणाल भूमकर, लिना भूषण भूमकर, अनिरुध्द कृष्णा झालटे, जयश्री एकनाथ सोपल, विजयकुमार रघुनाथ बंडेवार यांनी संगनमताने संस्थेचे सर्व संचालक हे अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. असे दर्शवून अल्पसंख्याक मंत्रालयाकडे संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव दिला. त्यानुसार संस्थेला दि. 11/04/2016 ला अल्पसंख्यांक दर्जा मिळाला. त्यानंतर संस्थेने पदभरती केली.

संस्थेतील वरिष्ठ लिपिक नंदकुमार रणदिवे यांनी त्याबाबत तक्रार केल्यानंतर दि. 1/9/2018 हा दर्जा रद्द झाला. यावेळी संचालकांनी पुर्वीचे संचालक जैन धर्माचे असल्याचे संगनमताने बनावट दाखले तयार केले असल्याचे उघडकीस आले. केवळ संस्थेला पदभरतीचे अधिकार मिळावेत म्हणून हा गैरप्रकार केल्याचे समोर आले. त्यामुळे संचालकांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अरुण सावंत यांनी वैराग पोलिस ठाण्यात, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे आणि पोलिस अधीक्षकांकडे केली, त्याची दखल न घेतली गेल्यामुळे न्यायलयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होवून वरील आदेश झाला.

Related Stories

जनतेला धुळीच्या त्रासातून मुक्त करा, अन्यथा अधिकाऱ्याला धुळीने अंघोळ घालू : श्रीकांत डांगे

Archana Banage

करमाळा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी जाहीर

Archana Banage

‘कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय’

Archana Banage

सोलापूर : महिला अत्याचाराच्या सर्वाधिक घटना फडणविसांच्या काळात

Archana Banage

करमाळा तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ

Archana Banage

शरद पवारांच्या उपस्थितीत कुकडी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Archana Banage