Tarun Bharat

सोलापूर शहरात आज 37 कोरोना पॉझिटिव्ह तर एक मृत्यू

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात शुक्रवारी नव्याने 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने 38 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर शहरात शुक्रवारी 1566 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1529 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 37 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 21 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6225 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 54858
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6225
-प्राप्त तपासणी अहवाल : 54858
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 48633
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 396
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1169
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4660

Related Stories

सोलापूर : वेळापुरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार

Archana Banage

छत्रपतीही मावळे तयार करतात- शहाजीराजे

Archana Banage

Solapur : बारा लाख जनावरांचे होणार लसीकरण

Abhijeet Khandekar

पावणे नऊ कोटीचा कर न भरल्याने गुन्हा

Abhijeet Khandekar

अखर्चित निधी व व्याजाची रक्कम मागणीच्या निर्णयात बदल करू – ना. हसन मुश्रीफ

Archana Banage

चिंचणी पर्यटन स्थळ म्हणून घोषित

Archana Banage