Tarun Bharat

सोलापूर शहरात तब्बल 91 नवे कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

तरुण भारत संवाद सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात आज रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 91 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने 13 जनांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
 

सोलापुरात आज 175 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 91 पॉझिटीव्ह तर 86 अहवाल निगेटिव्ह आले. एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1401 झाली आहे. आज सापडलेले 91 पॉझिटीव्ह रुग्ण राम मंदिर, दाजी पेठ, साखर पेठ, मंगळवार पेठ, इंदिरा वस्ती, भवानी पेठ, किसन नगर, अक्कलकोट रोड, अंबिका नगर, अक्कलकोट रोड, संतोषी माता नगर, शेळगी, पोलिस क्वार्टर, रंगराज नगर, रविवार पेठ, जुना विडी घरकुल, ओम निवास नगर, सुपर मार्केट, भवानी पेठ, मार्कडेय हॉस्पिटल जवळ, आवंती नगर, धनश्री लाईन, एस.टी.स्टॅन्ड, दक्षिण कसबा, मड्डी वस्ती, भवानी पेठ, महालक्ष्मी चौक, विडी घरकुल, समाज कल्याण, मुरारजी पेठ, न्यु बुधवार पेठ, यश नगर, मुरारजी पेठ, जोडभावी पेठ, सिध्देश्वर नगर, उत्तर सोलापूर, न्यु पाच्छा पेठ, रविवार पेठ, दोरकर गल्ली, सोलापूर विदयापीठ, केंगाव, मंगळवार पेठ, स्वागत नगर आणि घोंगडे वस्ती येथे सापडले आहेत.

तसेच शिवगंगा नगर, कमल हॉल परिसरातील 85 वर्षाच्या व्यक्तिचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित 506 जणांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

टायरची चोरी करणाऱया पोलिसासह तिघांवर गुन्हा

Abhijeet Shinde

विजापूर जिल्ह्यात प्रवेशासाठी कर्नाटकची नाकाबंदी

Abhijeet Shinde

आपत्कालीन व्यवस्थापन आणि आग नियंत्रण कार्यशाळेस प्रतिसाद

prashant_c

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर;मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार?

Abhijeet Khandekar

”भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्लीला पाठवू नये”

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जिल्हय़ात ५३४ बाधित,१३ बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!