Tarun Bharat

सोलापूर शहरात १५ तर ग्रामीणमध्ये ४६० नव्या कोरोनाबाधितांची भर

एकाच दिवशी जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू 

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर  शहरात शनिवारी १५ तर ग्रामीण भागात ४६० नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी २३ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नवे कोरोनाबाधित ४६० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी २३ रुग्णांचा मृत्यू तर ५८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. ४६० पैकी २८२ पुरुष, १७८  स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत २७१६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १ लाख २६ हजार २० कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ४ हजार १९०  रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी  दिली.  जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज १३३७७ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  १२९१७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर  ४६० पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत २७१६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १ लाख १९ हजार ११४ जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

सोलापुर शहरात नव्याने १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने  एकाचाही  मृत्यु झाला नसल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात  २२२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर २२१२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. १५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ७ पुरुष तर ८ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार २७० झाली आहे.

Related Stories

पुण्यात टिळकांवर आंतरराष्ट्रीय परिषद

prashant_c

सांगली : क्रांतीस्मृतीवनातील वृक्षांना लावणार “बारकोड” ; सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचा पुढाकार

Archana Banage

आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

Archana Banage

निधीअभावी शहरातील प्रकल्प रखडणार नाहीत

Archana Banage

पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar

सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंदचे आदेश – जिल्हाधिकारी

Archana Banage