Tarun Bharat

सोलापूर : शहरात ४८ तर ग्रामीणमध्ये ३१ पॉझिटिव्ह रुग्ण

दिवसभरात तिघांचा मृत्यू जिह्यातील एकूण रुग्णसंख्या 2,609

तरुण भारत सवांद, प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहरात ४८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण तर २ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात कोरोनाचे ३१ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. शहर आणि जिह्यात एकूण रुग्णांची संख्या २६०९ एवढी झाली आहे.

सोलापूर शहारात सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान २ जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल ५७ जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली. शहरात सोमवारी२११ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ४८ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३७ पुरुष तर ११ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२६५ झाली आहे. तसेच उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने तब्बल ५७ जनांना घरी सोडण्यात आले.

ग्रामीण भागात ३१ पॉझिटिव्ह
ग्रामीण भागात सोमवारी ३१ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये १७ पुरुष, १४ महिलांचा समावेश आहे. एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात एकूण ३४४ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित १९७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. माणिक पेठ, अक्कलकोट एक, घाणेगाव, बार्शी एक, वैराग एक, मुळेगाव, दक्षिण सोलापूर ६, बोळकवठा, दक्षिण सोलापूर एक, होटगी स्टेशन एक, वांगी, दक्षिण सोलापूर ८, हत्तूर ७, बोरामणी एक, कुंभारी ३, मार्डी सोलापूर १ येथे नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. आज ११२ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ८१ अहवाल निगेटिव्ह आले, तर ३१ पॉझिटिव्ह आढळल्ले आहेत. ३४४ रुग्णांपैकी २१२ पुरुष, १३२ महिला आहेत. तालुक्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला, तर १३० जण बरे होऊन घरी गेले आहेत.

ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट – ६७ बार्शी – ५१
माढा- ८ माळशिरस – ५
मोहोळ- १७ उत्तर सोलापूर – २४
करमाळा- १ सांगोला – ३
पंढरपूर ९ दक्षिण सोलापूर -१५९
एकूण ३४४ होम क्वारंटाईन १ हजार ८०१
आजपर्यंत तपासणी- ३ हजार ६७३
प्राप्त अहवाल- ३ हजार ६४४
प्रलंबित अहवाल- २९
एकूण निगेटिव्ह – ३ हजार ३०१
कोरोनाबाधितांची संख्या- ३४४
रुग्णालयात दाखल – १९७
आतापर्यंत बरे – १३०
मृत – १७

महापालिका आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे आजारी पडले आहेत. परिणामी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्या स्वॅबची तपासणी झाली असून महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा रिपोर्ट ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आला असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली. महापालिकेच्या अधिकाऱयांना रविवारी सकाळपासून सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास सुरु होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी आला असून यामध्ये महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना कोरोना झाल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. परिणामी आयुक्त पी. शिवशंकर यांना होम क्वॉरंटाईन केले आहे. ते घरुनच कामकाज पाहणार आहेत. तर नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे हे महापालिकेचे काम पाहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याबरोबर व इतर अधिकाऱयांबरोबर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा बैठकीच्या दरम्यान संपर्क झाल्याने जिल्हाधिकारी यांना देखील सध्या कोणतेही लक्षणे नसले, तरी घरूनच कामकाज करण्यासंदर्भात सूचना दिल्या असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या संपर्कात आले आयुक्त
दोन दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोलापूर दौऱयावर आले होते. या दौऱयानिमित्त विविध ठिकाणी बैठका झाल्या. यामध्ये जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी सहभागी होते. यावेळी बैठकीदरम्यान आयुक्त शिवशंकर या सर्वांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या बैठकादरम्यान उपस्थीत सर्वांच्या तपासण्या केल्या जाणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

Related Stories

अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातूनच रसद

datta jadhav

`उजनी’तील पाच टीएमसी सांडपाणी मोजण्याचे आव्हान

Archana Banage

विराजस – शिवानी लवकरच अडकणार विवाहबंधनात

Archana Banage

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे विधी पंडित पदवीने सन्मानित

Archana Banage

‘तुमचा भुजबळ करू’ म्हणणाऱ्यांना कोर्टाने उत्तर दिलं : मंत्री भुजबळ

Archana Banage

सोलापुरात आणखी 1 कोरोनाचा रुग्ण; संख्या 13 वर

Archana Banage