कोरोनाने पाच जणांचा बळी
एकूण रुग्णसंख्या झाली 31 हजार 288
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर ग्रामीणमध्ये 434 रुग्ण सापडले. शहरात एकाचा तर ग्रामीणमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. शहरात एकूण रुग्णसंख्या 8 हजार 185 तर ग्रामीणमध्ये 23 हजार 103 म्हणजेच एकूण रुग्णसंख्या 31 हजार 288 एवढी झाली.
सोलापूर शहरात शुक्रवारी नव्याने 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 82 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली. सोलापूर शहरात शुक्रवारी 614 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 544 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 68 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 52 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8185 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 77901
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8185
प्राप्त तपासणी अहवाल : 77901
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 69716
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 466
उपचारात असलेल्यांची संख्या : 976
बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या : 6743
ग्रामीण भागात तब्बल 434 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, पाच रुग्णांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी तब्बल 434 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 314 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2917 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 434 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2483 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 434 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 257 पुरुष आणि 177 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23103 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 173808
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 23103
प्राप्त तपासणी अहवाल : 173670
प्रलंबित तपासणी अहवाल : 139
निगेटिव्ह अहवाल : 150566
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 633
उपचारात असलेल्यांची संख्या : 7227
बरे झालेल्यांची संख्या : 15244