Tarun Bharat

सोलापूर शहरात 15 तर ग्रामीणमध्ये 316 नवे कोरोना रुग्ण

एकाच दिवशी जिल्ह्यात 18 जणांचा मृत्यू 

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर  शहरात सोमवारी 15 तर ग्रामीण भागात 316 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 18 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज नवे कोरोनाबाधित 316 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू तर 764 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 316  पैकी 176 पुरुष, 140  स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 2755 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 26 हजार 793 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 4883 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  4567 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर  316 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2755 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 20 हजार 612 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

सोलापुर शहरात  नव्याने 15 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने  एकाही  रुग्णाचा मृत्यु झाला नसल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.  सोलापुर शहरात  2188 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2173 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 15 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 9 पुरुष तर 6 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28  हजार 307  झाली आहे.

Related Stories

रेवणसिध्देश्वर मंदिर परिसरात भरणार जनावर बाजार

Archana Banage

सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चा; कोणत्याही परिस्थितीत निघणारच

Archana Banage

माढा : भोसरेत तीघांना कोरोनाची लागण

Archana Banage

किणीत जुगार खेळताना छापा १ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यात आज ३८ जण कोरोना बाधित

Archana Banage

चंद्रपूर : विजेची तार टाकून 2 बिबटे अन् 2 अस्वलांची शिकार

prashant_c