Tarun Bharat

सोलापूर शहरात 20 कोरोना पॉझिटिव्ह, दोन मृत्यू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर


सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 54 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.

    सोलापूर शहरात सोमवारी 879 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 859 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 20 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 14 पुरुष तर 6 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9632 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 97909
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9632
-प्राप्त तपासणी अहवाल : 97909
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 88277
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 537
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 420
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 8675

Related Stories

ठिबक सिंचन अनुदान वाटपात करमाळा तालुका जिल्ह्यात अव्वल

Abhijeet Khandekar

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा : आंबेडकर

Archana Banage

‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाला संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार

prashant_c

सोलापूर ग्रामीण भागात तब्बल 434 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, पाच मृत्यू

Archana Banage

सोलापूर : करमाळा शहरातील व्यापारी, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

Archana Banage

बोंडले येथील तरुण उजनी कालव्याच्या पाण्यात बेपत्ता

Archana Banage