प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात बुधवारी नव्याने 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 44 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापूर शहरात 606 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 575 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
31 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 23 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9 हजार 138 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 86520
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9138
-प्राप्त तपासणी अहवाल : 86520
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 77382
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 511
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 734
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7893


previous post