Tarun Bharat

सोलापूर शहरात 32 तर ग्रामीणमध्ये 527 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एकाच दिवशी जिल्ह्यात 23 जणांचा मृत्यू 

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर  शहरात मंगळवारी 32 तर ग्रामीण भागात 527 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 23 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज नवे कोरोनाबाधित 527 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 21  रुग्णांचा मृत्यू तर 887 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 527  पैकी 302 पुरुष, 225  स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 2626 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 23 हजार 926 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 5 हजार 292  रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी  दिली. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 8049 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 7522 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर  527 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2626 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 16 हजार 008 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

सोलापुर शहरात  नव्याने 32 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 55  रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने  2 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात 1980 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1948 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 32 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 16 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 198  झाली आहे.

Related Stories

बार्शीतील कोरफळेत एकाचा अनैतिक संबंधातून खून

Archana Banage

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पाचपट वाढ

Archana Banage

सोलापुरात मटका टोळी दोन वर्षासाठी तडीपार

Archana Banage

दिवे घाटात, माउली थाटात.!

Abhijeet Khandekar

शहीद सुनिल काळे पंचतत्वात विलीन

Archana Banage

सोलापूर : लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची उद्या टंकलेखन परीक्षा

Archana Banage