Tarun Bharat

सोलापूर शहरात 47 नवे कोरोना बाधित, दोघांचा मृत्यू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 47 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 19 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 318 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 47 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 271 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 47 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 22 पुरुष तर 25 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7079 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 68961
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7079
-प्राप्त तपासणी अहवाल : 68905
-प्रलंबित तपासणी अहवाल : 56
-निगेटिव्ह अहवाल : 61826
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 429
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 761
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 5889

Related Stories

सोलापूर जिल्ह्यात दुपारी 12 पर्यत पदवीधर 20.72 तर शिक्षक मतदारसंघासाठी 35.36 टक्के मतदान

Archana Banage

करमाळा शहरासह तालुक्यात ४७ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये ६५० जण कोरोनामुक्त, २६५ पॉझिटिव्ह तर ८ जणांचा मृत्यू

Archana Banage

करमाळ्यात आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस

Archana Banage

बार्शीत शुक्रवारी आढळले १९ रुग्ण, एकूण संख्या १४०

Archana Banage

अन्नछत्र मंडळाच्यावतीने पानीपतकार विश्वास पाटीलांचा सन्मान

Archana Banage