Tarun Bharat

सोलापूर शहरामध्ये ५४ तर ग्रामीणमध्ये २१४ रुग्ण

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहरात शुक्रवारी एकूण 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 133 जणांना घरी सोडण्यात आले. ग्रामीणमध्ये एकूण 214 रुग्ण आढळले असून मृतांची संख्या 9 आहे. शहर आणि जिह्यातील एकूण रुग्णसंख्या 17 हजार 120 एवढी झाली आहे.

सोलापूर शहरात शुक्रवारी 984 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 930 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 54 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 31 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 505 झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 60294
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 6505
प्राप्त तपासणी अहवाल 61185
प्रलंबित तपासणी अहवाल 93
निगेटिव्ह अहवाल 54680
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 408
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या 945
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 5152

ग्रामीण भागात तब्बल 214 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी तब्बल 214 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 206 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2 हजार 213 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 214 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 999 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 214 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 125 पुरुष आणि 89 स्त्रियांचा समावेश आहे. जिह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 615 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 79937

ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 10615
प्राप्त तपासणी अहवाल 79835
प्रलंबित तपासणी अहवाल 102
निगेटिव्ह अहवाल 69220
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 308
रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 2836
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या 7472

Related Stories

सोलापूर शहरात नवे 116 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन व्हेंटिलेटर उपलब्ध करावे : भरत अवताडे

Abhijeet Shinde

भक्तांना विठोबाचे आता फक्त बारा तासच दर्शन

Abhijeet Shinde

सोलापुरात आणखी एक कोरोनाचा पाॉझिटिव्ह; आकडा १४ वर

Abhijeet Shinde

मनोहर भोसले याच्यासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत

prashant_c
error: Content is protected !!