Tarun Bharat

सोलापूर : संभाजीराजेंच्या आंदोलनास मराठा बांधवांचा पाठिंबा

Advertisements

सर्वांनी खासदार छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत जाण्याचा निर्धार
सकल मराठाचे समन्वयक माऊली पवार, क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे यांची माहिती

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :

मराठा आरक्षण संदर्भात सोमवारी शासकीय विश्रामगृह व छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय येथे सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत सोलापूर शहर जिह्यातील मराठा बांधवांनी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी राजे 16 जून रोजी कोल्हापुरात राजषी शाहू महाराज समाधी येथे मौन आंदोलन करणार आहेत. त्यासाठी सोलापुरातून मोठÎा संख्येने मराठा बांधव जाणार आहेत.

 प्रारंभी शहरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बळीरामकाका साठे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मराठा आरक्षण कशा पद्धतीने मिळवायचं याची चर्चा झाली. मराठा समाजाच्या विविध पाच मागण्यासाठी उद्या पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत बैठक होणार असून या मागण्या काका साठे मांडणार आहेत. खासदार संभाजी महाराज कुठल्याही पक्षाची भूमिका न घेता समाजासाठी सर्वांना एकत्रित करीत आहेत. सर्वांनी छत्रपती संभाजी राजे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय, निर्धार केलेला आहे. या बैठकीसाठी प्रताप चव्हाण, विनोद भोसले, अमोल शिंदे, सुनील रसाळ, तुकाराम मस्के, महेश धाराशिवकर, रवी मोहिते यांच्यासह मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

दुसरी बैठक दुपारच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज रात्र महाविद्यालय या ठिकाणी पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण कशा पद्धतीने मिळवायचे यासाठी वकील, तालुक्मयातील मराठा बांधव, महिला, विविध पक्षातील नेत्यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान, 16 जून रोजी छत्रपती संभाजी महाराज हे मौन आंदोलन करणार असल्यामुळे सोलापुरातून एक गाव, एक गाडी  अशा प्रमाणे मोठ्या संख्येने मराठा बांधव कोल्हापूरला जाणार आहे. या आंदोलनाला जिह्याचा पाठिंबा असल्याची सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी सांगितले. सोलापुरात जेव्हा खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आंदोलन असेल तर चार हुतात्मा पुतळा येथे होईल तारीख लवकरच जाहीर करू, असे सांगितले.

या बैठकीसाठी सकल मराठा समाजाचे माऊली पवार, शहाजी पवार, मनोहर सपाटे अमोल शिंदे, भाऊ रोडगे, प्रल्हाद काशीद, आनंद जाधव, राजन जाधव, अश्विनी भोसले, लता ढेरे यासह सोलापूर शहर व जिह्याच्या तालुक्मयातील मराठा बांधव उपस्थित होते.

तर भविष्यात आपली पिढी माफ करणार नाही

मराठा आरक्षणासाठी आता खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत येणे गरजेचे असून आमचा राजेंना पाठिंबा असेल. गाडी फोडण्याचे वक्तव्य बरोबर नाही. मराठा बांधवांचा नुकसान होते. आरक्षणासाठी आपल्या पक्षातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणे गरजेचे. कृपया दोन बैठका घेऊ नका, 24 खासदार मराठा, बाकीचे पण येतील एकत्रित येऊ अन्यथा भविष्यात आपली पिढी माफ करणार नाही.

– अमोल शिंदे, मनपा विरोधी पक्षनेते

आपली लढाई केंद्र सरकारविरोधात

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. सर्वांनी त्यांच्यासोबत राहावे. आपली लढाई ही केंद्र सरकार विरोधात आहे.

– दिलीप कोल्हे, मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा देऊ

मागील पाच वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. सर्वांनी एकत्रित येत छत्रपती राजे यांना पाठिंबा द्यावा. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा देऊ. कोल्हापुरात मोठÎा संख्येने सोलापुरातील मराठा बांधव जाणार आहे.

– माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज

Related Stories

सोलापूर शहरात १०२ तर ग्रामीणमध्ये तब्बल २६० रुग्णांची भर

Abhijeet Shinde

पालिकेच्या आरोग्य विभागात खांदेपालट होणार कधी?

Patil_p

मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी दलित महासंघाचे धरणे

Patil_p

स्वातंत्र्य लढ्यातील सोनेरी पर्वाचा अंत; कॅप्टन रामचंद्र लाड यांचे निधन

Vivek Porlekar

महापालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात दहा दिवसात पाच हजार अँटिजेन टेस्ट करणार : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!