Tarun Bharat

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या संचालक,सीईओ पदी आयुक्त पी.शिवशंकर यांची निवड

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

स्मार्ट सिटीची बैठक सात रस्ता येथील कार्यालयात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. यावेळी संचालक व सीईओ पदी नूतन आयुक्त पी. शिवशंकर यांची निवड करुन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बैठकीत शहरातील एलईडी लाईट, लाईट पोल, शहरात लाईट पोल बसवण्याचे काम सुरू, शहरातील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असलेले रस्त्याची कामे, सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण, लक्ष्मी मार्केट सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम विकसित करणे, इ-टॉयलेट, डस्ट बीन, उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाइन या विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे पीक नुकसान, जमीन सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून मोजणीच्या कामास सुरुवात होणार आहे.

उजनी विमान नगर येथे पंपिंग स्टेशन उभारणे कामी सर्वजनिक आरोग्य अभियंता कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागा निश्चित केलेली आहे. एबिडी एरिया मधील मलनिस्सारण, पाणीपुरवठा लाईन, रस्ते तयार आदी कामाचा आढावा आणि प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच व्हिडीओ कॉन्फरस द्वारे सह संचालक नगर रचना, पुणे अविनाश पाटील, उप सचिव, दिल्ली चे पी. सी. धसनामा हे संचालक सहभागी झाले होते.

या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, संचालक नरेंद्र काटिकर, संचालक चंद्रशेखर पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Stories

ग्रामपंचायत विधेयकावरुन भाजपचा सभात्याग

Tousif Mujawar

OBC RESERVATION : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर

Archana Banage

प्राणीप्रेमींमुळे बिऊर येथे नागास जीवदान

Archana Banage

”बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली निघाले”

Archana Banage

अनिल परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत : रामदास कदम

Archana Banage

राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; २६/११ हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन

Archana Banage