Tarun Bharat

सोलापूर : हगलूर येथे महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

हगलूर गावाजवळ केले विष प्राशन

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर-शहर पोलीस दलातील महिला पोलीस अमृता रमेश पांगरे (वय 38, रा. बाळे, सोलापूर) यांनी विष प्राशन करून बुधवारी दुपारी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ग्रामीण भागातील हगलूर बस स्थानकावर अमृता यांचा मृतदेह आढळून आल्याची चर्चा सुरू आहे.

अमृता पांगरे या जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे वाचक शाखेत कार्यरत होत्या. गेल्या चार वर्षापासून त्या या पोलीस स्टेशन येथे कार्यरत होत्या. त्याच्या पश्चात एक मुलगा पती असा त्यांचा परिवार आहे. पती हे खाजगी कंपनीतमध्ये नोकरीस आहे. अमृता पांगरे यांच्या मृत्यूची माहिती वाऱ्यासारखी पसरली. सहकारी महिला पोलिसांनी ताबडतोब सिव्हील हॉस्पिटल गाठले आणि दुःख व्यक्त केले.

Related Stories

निवडणुकीमुळे सोलापुरात उद्यापासून तीन दिवस मद्य विक्री बंद

Archana Banage

सोलापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यात मंगळवारी ३८ नवे कोरोना बाधित

Archana Banage

सोलापूर : बार्शी बाजार समितीचा संप मागे

Archana Banage

महाआरोग्य शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा;तानाजी सावंत

Archana Banage

कळंब न. प. च्या उपाध्यक्षांसह दोन नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठींकडून निलंबनाची कारवाई

Archana Banage