Tarun Bharat

सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कुरुंदवाडे लाचलुचपतच्या जाळ्यात

Advertisements

प्रतिनिधी / सरवडे

सोळांकूर ता. राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक वर्ग 1 चे डॉ. सुनील कुरुंदवाडे (रा.कोल्हापूर) यांना एन.आर.एच.चे डॉ. राजेंद्र इंगवले व इतर सहकांच्याकडे 30 हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

या लाचेची चर्चा फोनद्वारे रेकॉर्डिंग करण्यात आले होते. त्याद्वारे त्यांना 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दुपारी 3 च्या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक डॉ. आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, ए. एस. आय मनोहर कणगावकर, पोलीस नाईक मनोज खोत, शरद पोरे, विकास माने, रुपेश माने, शैलेश पोरे या पथकाने त्यांना अटक केली आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, डॉ. कुरुंदवाडे यांच्याकडे ग्रामीण रुग्णालय राधानगरी याचाही अतिरिक्त कार्यभार असून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एन.आर.एच.)चे डॉ. राजेंद्र इंगवले व इतर दोन डॉक्टर, स्टाफ यांच्या परफॉर्मन्स, वेतनवाढ रिपोर्ट कोल्हापूर सिव्हिल सर्जन यांच्याकडे पाठवण्यासाठी डॉ. कुरुंदवाडे यांनी 35 हजारांची मागणी केली होती. परंतु चर्चेअंती 30 हजार देण्याचे कबुल करण्यात आले. या व्यवहारात पंटर सुहास टिक्केकर (रा.कोल्हापूर) याचाही समावेश आहे. या सर्व व्यवहाराची फोन टँपिंग करण्यात आले होते. त्याद्वारे गेली 2-3 दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्यानुसार दुपारी तीन वाजता सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात अटक करण्यात आली.पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी करत आहेत.

Related Stories

पूररेषा, नगर रचना नियमांचे पुनर्विलोकन करा : जलसंपदामंत्री

Abhijeet Shinde

आता फक्त मरण स्वस्त ; राजू शेट्टींची पोस्ट व्हायरल

Abhijeet Khandekar

कोरोना विरोधात लढणाऱ्या पोलिस आणि पत्रकारांची आरोग्य तपासणी

Abhijeet Shinde

गोकुळचा दूध विक्रीत विक्रम

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस

Abhijeet Shinde

कापशीतील साडेसात वर्षाच्या बालकाला अज्ञाताने पळवले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!