Tarun Bharat

सोशल क्लबवरील छाप्यात 8 जुगाऱयांना अटक

कलखांब येथे कारवाई : जुगाराच्या साहित्यासह मोबाईल, 6 हजार रुपये जप्त

प्रतिनिधी /बेळगाव

कलखांब येथील एका सोशल क्लबमध्ये अंदर-बाहर जुगार खेळणाऱया आठ जुगाऱयांना शुक्रवारी मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 हजार 100 रुपये रोख रक्कम, पाच मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. कलखांब येथील भाग्यलक्ष्मी सोशल ऍण्ड स्पोर्ट्स क्लबमध्ये अंदर-बाहर जुगार सुरू होता. अचानक छापा टाकून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

शमला इरदुल्ला मकानदार, वेंकाप्पा सुंकाप्पा संदीमनी (दोघेही रा. रुक्मिणीनगर), कन्नय्या सिद्धराम चिक्कलदीन्नी (रा. काकती), नागेश फकिराप्पा त्यानगी, हणमंत इराप्पा शिगीहळ्ळी (दोघेही रा. कणबर्गी), कऱयाप्पा यल्लाप्पा नायक, रवी प्रकाश कानट्टी (दोघेही रा. कलखांब), संजीव जयसिंग पाटील (रा. मुतगा) अशी अटक करण्यात आलेल्या या जुगाऱयांची नावे आहेत.

या र्संर्वांवर मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

मण्णीकेरी महालक्ष्मी मंदिरातील तीन लाखाचे दागिने लंपास

Omkar B

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सर्वोत्कृष्ट ‘जिल्हा रिटर्निंग ऑफिसर’ पुरस्कार

Sandeep Gawade

बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

कंग्राळी बुद्रुक येथे गवतगंजीला आग

Amit Kulkarni

विधानसभेत आवाज उठविण्यासाठी अॅड. अमर येळ्ळूरकर यांना विजयी करा

Patil_p

यंदा तलावांमध्ये सोडणार 92 लाख मत्स्यबीज

Amit Kulkarni
error: Content is protected !!