Tarun Bharat

सोशल मिडीयाच्या आहारी जावून खून केल्याची कबुली

महाविद्यालयीन खून प्रकरणातील अल्पवयीन मित्रास अटक

Advertisements

लातूर : प्रतिनिधी

दोन दिवसापुर्वी लातूरच्या विशालनगर परिसरात दिवसा कोयत्याने वार करून रोहन सुरेश उजळंबे रा. लोदगा या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ठार करण्यात आले होते. या प्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली होती. त्यात या प्रकरणी त्याचा अल्पवयीन मित्रास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तो पुणे येथे नातेवाईकांकडे पळून गेला होता. तपासासाठी नेमलेले पथक त्याच्यापर्यंत पोहचत असल्याचा सुगावा लागताच तो परत लातूरकडे निघाला. लातूर पोलीसांनी त्याला पीव्हीआर चौकात गाठुन अटक केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन, पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जगदाळे, एमआयडीसी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आदिंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अटक करण्यात आलेला हा तरूण अल्पवयीन असुन तो रोहन उजळंबे याचा मित्र आहे. महाविद्यालीयन शिक्षण घेत असलेला आरोपी अभ्यासात हुशार होता. घरची परिस्थितीत अत्यंत हलाखीची होती. वडीलांनी त्याला शिक्षणासाठी लातूर येथील दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला होता. परंतू त्याने आपल्या हुशारीचा वापर मोबाईलच्या माध्यमातून इन्स्टाग्राम, फेसबुक आदि सोशल मिडीयाच्या आहारी जावून पाच हजार रूपयांच्या देवाण-घेवाणीतून मित्राने आपला अपमान केल्याचा बदला मनात धरून त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने गुन्ह्यात वापरण्यात आलेली कत्ती बाजारातून विकत घेतल्याचे पोलीस तपासात कबुल केले. तो आपल्या मित्रासोबत फिरला. त्याचे पैसे परत देण्याचे अमीष दाखवून त्याला एकत्र गाठून सपासप कत्तीने वार केला. त्यानंतर तो पळून जाण्यात तो यशस्वी झाला. हे सर्व कृत्य त्याने अतीशय चाणाक्षपणाने विविध सोशल मिडीयाच्या वापरातून केल्याचे निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तूचीही विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. परंतू पोलीस या सर्व बाबी तपासण्याच्या मार्गावर आहेत. या प्रकरणात कोणत्याही मित्राचा सहभाग नसल्याचे सांगुन ही घटना प्रेम प्रकरणातून घडली नसल्याचेही पोलीसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

परंतू हा गुन्हा करताना त्याने आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नातेवाईकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केल्याचे कबुल केले. अतीशय गरीब व शेतकरी कुटूंबातील हे दोन्ही मित्र होते. आई-वडीलांनी शिक्षणासाठी लातूरात भाड्याची खोली घेवून शिक्षणासाठी ठेवले होते परंतू सोशल मिडीया आणि मोबाईलच्या आहारी जावून अशा प्रकारचे कृत्य केल्याचे पोलीस तपासाअंती निष्पन्न झाल्याचे दिसून येते. पालकांनी आपला पाल्य कुठे शिकतो व तो काय करतो यावर पालकांनी नजर ठेवणे गरजेचे आहे असे आवाहनही पोलीस अधिकार्‍यांनी यावेळी केले.

Related Stories

सोलापूर शहरात आढळले 106 कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

विक्रमी नोंद! महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

Rohan_P

लातूर : विलास कारखान्यानंतर जिल्ह्यातील सिध्दी शुगरची पावणे तीन कोटींची फसवणूक

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांचा ६ हजारचा टप्पा पार, आज ११३ पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना CBI कडून क्लीन चिट

datta jadhav

बिहार : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!