Tarun Bharat

सोशल मीडियावरचा शिकारी अडकला वनविभागाच्या जाळ्यात

Advertisements

वार्ताहर / कास :

सोशल मीडियावर आपल्या मित्रमंडळीत क्रेज दाखविण्याच्या उद्देशाने वादग्रस्त पोस्ट करने एकाला चांगलेच महागात पडले असून, वनविभागाचा चौकशीचा ससेमिरा त्याच्या मागे लागला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे चिकणवाडी (करंडी त मेढा) या वस्तीतील नितीन आनंदा चिकणे याने स्वत:च्या फेसबुक अकाऊंटला शिकारीच्या उद्देशाने पोस्ट टाकली. मुंबई वरून गावाला आलो की आपला आवडता छंद बंदूक घेऊन शिकार करणे, वाघरी लावणे असं बेधडक लिहून फेसबुक वर टाकले. काहीतरी सापडणारच असा अतिआत्मविश्वास ही व्यक्त केला. वरून शिकार करण्याच्या ठिकाणचे फोटो ही टाकले. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आणि नितीन वनविभागाच्या रडारवर आला.  मेढा वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने चिकणवाडी गाठली. वनविभागाचा ताफा बघून नितीनला घामच फुटला. वनविभागाने चौकशीला सुरुवात करताच नितीनने सदर पोस्ट दारूच्या नशेत मित्रांच्या नजरेत प्रतिष्ठा वाढविण्याच्या उद्देशाने टाकली असल्याचे सांगितले. शिकारीचा उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले. पंचा समक्ष नितीन चिकणे यांच्या घराची झडती घेतली असता कोणत्याही प्रकारचे शिजवलेले अथवा कच्चे मांस आढळून आले नाही. घरातील लाकडी कपाटात दोन वडिलोपार्जित जुनी वाघरी (जाळी) मिळून आल्या. फेसबुक पोस्टमध्ये चार ठिकाणी वाघरी लावण्याचा उल्लेख केला होता. केलेल्या पाहणीत त्या ठिकाणी वाघरी लावल्याच्या खुणा दिसून आले नाहीत.

नितीनने पोस्टमध्ये विशेष टिप लिहून दिमाखात लायसनवाली बंदूक असल्याचा उल्लेख पोस्टमध्ये केला होता. त्याची चौकशी केली असता त्याचे आजोबा रामचंद्र हरिबा चिकणे यांची नावे परवाना असलेली बंदूक मेढा पोलीस स्टेशन येथे जमा केल्याचे पावती वरून स्पष्ट झाले. नितीन चिकणेला अधिक चौकशीसाठी मेढा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आले असून, पुढील तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रंजन सिंह परदेशी, वनपाल आर. एस. शेख, वनरक्षक निलेश रजपुत, आर. एस. कांबळे करीत आहेत.  

Related Stories

‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात नुकसान

datta jadhav

साताऱयात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

Patil_p

संकलित करावरील शास्ती माफ करावी

Amit Kulkarni

Satara : पीएफआयच्या विरोधात शिवतीर्थावर निदर्शने; विद्यार्थी परिषदेची घोषणाबाजी

Abhijeet Khandekar

ऑन लाईन सभेऐवजी छ.शाहू कला मंदिरात सभा घ्या

Patil_p

‘प्रेमग्रंथ’ अल्बम अप्रतिम : खा. उदयनराजे भोसले

datta jadhav
error: Content is protected !!