Tarun Bharat

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

Advertisements

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱयांवर होणार कारवाई

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यात हिजाब व भगवी शाल यावरुन सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांततेला धक्का पोहोचू नये यासाठी सोशल मीडियावर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱयांनी दिला आहे.

शनिवारी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी या संबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱयांसंबंधी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

व्हॉट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणे, या मुद्दय़ावरुन सामाजिक शांततेला धक्का पोहोचेल अशी कोणतीही कृती करणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस उपायुक्तांनी दिला आहे.

Related Stories

अविनाश पाटील यांचे पक्षीप्रेम

Amit Kulkarni

सीडी उखडून टाकल्याने वाहतुकीस अडथळा

Amit Kulkarni

उच्च शिक्षित युवक करतोय देशी गो-पालन!

Amit Kulkarni

रत्नागिरी जिल्हा सोमवारी ‘कोरोना शून्य’

Patil_p

कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांसह कुटुंबीयांची कोरोना चाचणी

Amit Kulkarni

शवागारात 9 मृतदेह तर अहवालात दोनच नोंद

Patil_p
error: Content is protected !!