Tarun Bharat

सोसायटी मतदारसंघात शंभर टक्के मतदान

Advertisements

वार्ताहर/ पाटण

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी पाटण सोसायटी मतदार संघात असणाऱया 102 पैकी सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सोसायटी मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले. सोसायटी मतदारसंघातील सहकार पँनेलचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर व त्यांचे पारंपरिक विरोधक उमेदवार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत चुरशीच्या वातावरणात दोन्ही बाजूंनी स्पर्धात्मक मतदान झाले. मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली असून मंगळवारी होणाऱया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाटण सोसायटीसह काही अन्य मतदासंघाच्या निवडणुकीसाठी रविवारी पाटण येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजण्यापूर्वीच मतदान केंद्रावर सोसायटी मतदारसंघातील मतदारांनी रांगा लावून अत्यंत उत्साहात मतदान केले. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणकर गटाच्या तर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई गटाच्या मतदारांनी यासाठी येथे शंभर टक्के मतदान केले. पाटण सोसायटी मतदारसंघातून एकूण 104 ठराव झाले होते, त्यापैकी घोटचा ठराव बाद झाला तर बनपुरी येथील एका मतदाराचा मृत्यू झाल्याने 102 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये उमेदवार ना .शंभूराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कामगार नेते सुजित पाटील आदी मान्यवर पदाधिकारी व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर पाटणकर, देसाई समर्थकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 या निवडणुकीत सोसायटी मतदार संघासाठी 103 पैकी एक मयत मतदार वगळता इतर सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागरी पतसंस्थामध्ये 29 पैकी 29 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अन्य महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, खरेदी -विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, गृहनिर्माण ,दूध संस्था, औद्योगिक विणकर आदींसाठीच्या 203 मतदारांपैकी 197 मतदारांनी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

Related Stories

आम्हाला काय होतयं? या भ्रमात राहू नका!

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात एका दिवसात 58,805 रूग्णांना डिस्चार्ज! पण 816 बळी

Rohan_P

दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली चक्क वडेट्टीवारांची आरती

Abhijeet Shinde

सातारा : जिल्ह्यातील ‘हे’ शहर आजपासून अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन

datta jadhav

साताऱयात जाणवला काश्मिरचा फिल

Patil_p
error: Content is protected !!