Tarun Bharat

सोहम बांदेकरचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण

आई- वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सोहम बांदेकर आता मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आदेश बांदेकर यांनी निर्मिती केलेल्या नवे लक्ष्य या मालिकेतील महत्त्वाच्या भूमिकेतून सोहम पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर नवे लक्ष्यही मालिका 7 मार्चपासून सुरू झाली आहे. अभिनेते दांपत्य आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा सोहम मुलगा आहे. सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध नवे लक्ष्य मालिकेतून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱया पोलिसांची शौर्य गाथा या मालिकेत पाहायला मिळेल. सोहम बांदेकरची नवे लक्ष्य ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतून तो छोटय़ा पडद्यावर दाखल होत आहे. आतापर्यंत अनेक स्टारकिड्सनी मालिका आणि चित्रपटातून मराठी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. त्यात आता सोहम बांदेकरचीही भर पडली आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या दोघांनीही दीर्घकाळ छोटय़ा पडद्यावरील विविध मालिकांतून आपलं स्थान निर्माण केलं आहे. स्वाभाविकच त्यांच्या चाहत्यांमध्ये सोहमच्या पदार्पणाची उत्सुकता आहे आणि आई वडिलांप्रमाणेच  प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे.

Related Stories

Karad News: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

Archana Banage

‘थार’ चित्रपट 6 मेला होणार प्रदर्शित

Patil_p

‘आर्या’च्या तिसऱया सीझनची घोषणा

Patil_p

‘सूप’ सीरिजमध्ये मनोज वाजपेयी

Patil_p

प्रियांकाकडून नवा होमवेयर ब्रँड

Patil_p

रूचिता म्हणतेय… आई मला नेसव तुझा शालू

Patil_p