Tarun Bharat

सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन आता नववर्षातच

आणखी एक महिना बंदी वाढविली, जिल्हाधिकाऱयांचा आदेश

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्र, कर्नाटक गोव्यासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा, जोगुळभावी सत्यम्मा आणि चिंचली मायक्का देवीचे दर्शन आणखी एक महिना बंद असणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंबंधी आदेश काढला असून 31 डिसेंबरपर्यंत तीनही प्रमुख मंदिरे बंद असणार आहेत. या काळात भाविकांना दर्शन घेता येणार नाही.

गेल्या आठ महिन्यांपासून जिह्यातील तीनही प्रमुख मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एक आदेश जारी केला आहे. 31 डिसेंबरपर्यंत या तीनही मंदिरांत दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेला बंदी आदेश आणखी एक महिन्यासाठी वाढविण्यात आले आहे. आता देवीच्या दर्शनासाठी नववर्षाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱयांच्या या पूर्वीच्या आदेशानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत ही तीनही प्रमुख मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. किमान डिसेंबरमध्ये तरी देवीचे दर्शन होणार अशी अपेक्षा होती. त्यातही बेळगाव जिह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत चालल्याने भाविकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र कोरोना महामारीचा वाढता फैलाव लक्षात घेऊन आणखी एक महिना बंदी वाढविण्यात आली आहे.

खास करुन सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्का देवी व जोगुळभांवी सत्यम्मा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. यंदा दसरा, दिवाळीतही भाविकांना देवीचे दर्शन झाले नाही. कोरोना महामारीचा फैलाव थंडीत वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकाऱयांनी खबरदारीची उपाय योजना म्हणून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी एक महिना दर्शन बंद ठेवण्याचा आदेश जारी ठेवला आहे.

धार्मिक विधी सुरू राहणार-

यासंबंधी सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटागस्ती यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हादंडाधिकाऱयांच्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत देवीचे दर्शन बंद असणार आहे. मात्र डोंगरावर चालणारी रोजची धार्मिक विधी, पुजा, अर्चा सुरू असणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

येळ्ळूर मारहाण; सुनावणीला सुरुवात

Amit Kulkarni

घरपट्टीवरील 5 टक्के सवलत देण्यासाठी मुदतवाढ

Patil_p

बसवण कुडचीतील रस्ताकाम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Omkar B

मंगळवारी जिल्हय़ात 219 नवे रुग्ण

Amit Kulkarni

हवामान बदलामुळे आरोग्याच्या समस्येत वाढ

Amit Kulkarni

विश्रुत स्ट्रायकर्स, डीके लायन्स संघ विजयी

Amit Kulkarni