Tarun Bharat

सौंदत्ती यल्लाम्मा मंदिराचे दर्शन खुले नाही..!

भक्तांनी खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये…

Advertisements

बैलहोंगल / वार्ताहर

सौंदत्ती येथील यल्लाम्मा दर्शनाला एक फेब्रुवारीपासून दर्शन खुले करण्यात आली सदर बातमी खोटी असून भाविकांनी दर्शनासाठी मंदिराकडे न येण्याची विनंती करण्यात आली आहे.

शनिवारी सोशल मीडियातून एक फेब्रुवारीपासून यल्लम्मा देवीचे दर्शन खुले असल्याची बातमी प्रसारित करण्यात येत आहे. ती बातमी चुकीची आहे. अशी माहिती यल्लाम्मा देवस्थानचे सीईओ रवी कोटार गस्ती यांनी दैनिक तरूण भारतशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की राज्य सरकारने ३१ जानेवारीपासून रात्रीचे कर्फ्यू हटवल्याने व काही ठिकाणचे निर्बंध हटवले असल्याने दि. १ फेब्रुवारीपासून सौंदत्ती येथील रेणुका मंदिर खुले करण्यात येणार असल्याचे सोशल मीडियातून प्रसारित करण्यात येत आहे. परंतु ही बातमी चुकीची असून भाविकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व सौंदत्ती यल्लाम्मा देवीकडे दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

मिरज येथील कवी संमेलनात बेळगावच्या कवींचा सहभाग

Patil_p

देवगिरी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

गावात एकी राखण्यासाठी प्रयत्न करा

Omkar B

एसटी कर्मचारी संप : शरद पवार- अनिल परब यांच्यात बैठक

datta jadhav

विविध महामार्गांच्या कामांचा आज नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

Amit Kulkarni

पीओपी गणेश मूर्तींवर बंदीचा निर्णय मागे घ्या

Nilkanth Sonar
error: Content is protected !!