Tarun Bharat

सौंदत्ती यात्रेत दोन ट्रॉलींचे ट्रक्टर आणण्यास बंदी

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक बंदोबस्त

महाराष्ट्र, कर्नाटकासह विविध राज्यातील कोटय़ावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणूका यल्लम्मा देवीचा यात्रोत्सव 6 ते 22 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या पार्श्वभूमिवर यात्रेला येणाऱया भाविकांच्या सुरक्षिततेसाठी डोंगरावर व्यापक बंदोबस्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली रामदुर्गचे पोलीस उपअधिक्षक शंकरगौडा पाटील, सौंदत्तीचे मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ नडवीनमनी आदी अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.

यात्रेसाठी लाखो भाविक डोंगरावर येतात. गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी रात्रोत्सवाला सुरुवात होणार असून तब्बल 17 दिवस म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे. या पार्श्वभूमिवर पोलीस प्रशासनाच्यावतीने भाविकांनी कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिह्यातील ट्रक्टरमधून भाविक डोंगरावर येतात. ट्रक्टरला दोन ट्रॉली लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बरोबरच भाविकांनी खास करुन महिलांनी आपल्या अंगावर किंमती दागिने घालून यात्रेत येवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जोगुळभांवी येथे पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नेहमी भाविकांची गैरसोय होते. या परिसरात वाहनांचे पार्किंग करता येणार नाही. भाविकांनी आपली वाहने थेट डोंगरावर न्यावी तेथून छोटय़ा वाहनांतून जोगुळभांवीत येवून दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डोंगरावर मद्यविक्री, जुगार मांसाहारावर बंदी आहे. यात्रेसाठी येणाऱया वयोवृध्द लहान मुलांची संबंधितांनी काळजी घ्यावी. गर्दी लक्षात घेऊन त्यांना टाळले तरी उत्तमच आहे. रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करु नये, अशी सूचना पोलीस प्रशासनाने दिली असून नागरिकांना कसल्याही प्रकारच्या अडचणी असल्यास स्थानिक पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

Amit Kulkarni

बेळगावच्या योगपटूंची चमक

Amit Kulkarni

भाजी झाली स्वस्त

Patil_p

अर्धवट कामांची पूर्तता व्हावी यासाठी नगरपंचायतीला टाळे

Amit Kulkarni

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हीव्हीपॅट -ईव्हीएमचे प्रशिक्षण

Amit Kulkarni

अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni