Tarun Bharat

सौंदर्यवर्धन करणारा कॉर्नस्टार्च

पदार्थाची लज्जत वाढवण्यासाठी कॉर्नस्टार्चचा वापर केला जातो. मात्र हेच कॉर्नस्टार्च सौंदर्यप्रसाधन म्हणूनही वापरता येतं. कॉर्नस्टार्चमध्ये लोह, फॉस्फरस, जस्त, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे घटक असतात. यासोबतच विविध जीवनसत्त्वांमुळेही कॉर्नस्टार्च उपयुक्त ठरतो. कॉर्नस्टार्चचा वापर ड्राय शँपू म्हणूनही करता येतो. तसंच हेअर मास्क म्हणूनही तुम्ही त्याचा वापर करू शकता.

* कॉर्नस्टार्च नैसर्गिक ड्राय शँपू म्हणून वापरता येतं. मेक अप ब्रशच्या मदतीने  कॉर्नस्टार्च केसांना लावा. ब्रश कॉर्नस्टार्चमध्ये बुडवून थोडा आपटा. यामुळे ब्रशला लागलेलं अतिरिक्त कॉर्नस्टार्च निघून जाईल. आता केसांच्या मुळांना कॉर्नस्टार्च लावा. सुगंधासाठी त्यात लवेंडर तेलाचे चार-पाच थेंब टाकू शकता.

* स्कॅल्प स्क्रब म्हणूनही कॉर्नस्टार्च वापरता येईल. कॉर्नस्टार्चच्या वापराने स्कॅल्प एक्सफोलाईट करता येईल. हा स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीत थोडा कॉर्नस्टार्च, बेकिंग सोडा आणि पाण्यात मिसळलेला लिंबाचा रस घ्या. याची पेस्ट तयार करा. शँपू लावण्याआधी या पेस्टने स्कॅल्प स्क्रब करून घ्या.

* कॉर्नस्टार्चपासून हेअर मास्क तयार करण्यासाठी एका वाटीत पाच ते सहा चमचे कोरफडीचा गर किंवा ऍलोव्हेरा जेल घ्या. यात दोन चमचे कॉर्नस्टार्च घाला. हा मास्क स्कॅल्पला लावा. साधारण तीन तासांनी शँपूने केस धुवा. आठवडय़ातून एकदा हा मास्क वापरता येईल. * घरीच नैसर्गिक पद्धतीने केस सरळ करायचे असतील तर नारळाचं दूध आणि कॉर्नस्टार्च वापरता येईल. अर्धा कप नारळाच्या दुधात दोन चमचे कॉर्नस्टार्च घाला. हे मिश्रण फेटून घ्या. हेअर ब्रशने केसांना लावा. साधारण तासाभराने शँपूने धुवून टाका. केस छान सरळ होतील.

Related Stories

बास्केटबॉलपटू ते लढाऊ वैमानिक

Omkar B

खरेदी दागिन्यांची

Amit Kulkarni

सेवाव्रती आयपीएस अधिकारी

Omkar B

किती काळ टिकतो सॅनिटायझर?

Omkar B

आणि तिचा कायापालट झाला

Amit Kulkarni

अंटार्क्टिकावरचं मराठी पाऊल

Omkar B
error: Content is protected !!