Tarun Bharat

सौदी अरेबियात पुरुषांवर निर्बंध

ऑनलाईन टीम / रियाध : 

सौदी अरेबियाने पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार आणि चाड या देशातील महिलांशी लग्न करण्यास पुरुषांवर निर्बंध घातले आहेत. मक्काचे पोलीस प्रमुख मेजर जनरल असफ अल कुरेशी यांनी स्थानिक मीडियाला यासंदर्भात माहिती दिली. 

कुरेशी म्हणाले, सौदीने आपल्या देशातील पुरुषांना विदेशी महिलांसोबत लग्न करण्यापासून रोखण्यासाठी नवीन नियम आणि अटी घातल्या आहेत. पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार आणि चाड या देशातील महिलांशी तेथील पुरुषांना लग्न करता येणार नाही. तसेच इतर देशातील महिलांशी लग्न करण्यासाठी सौदीतील पुरुषांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर घटस्फोटीत पुरुषांना घटस्फोट झाल्यानंतर सहा महिन्यात दुसरे लग्न करता येणार नाही. पुनर्विवाहाचे वय 25 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 

तसेच विवाहित व्यक्तीला दुसरे लग्न करायचे असल्यास पहिला जोडीदार विकलांग, शारिरीक दृष्ट्या अक्षम आणि दुर्धर आजाराने ग्रासल्याचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

Related Stories

…म्हणून ट्रम्प यांच्या नातवांना शाळेतून काढावे लागले

datta jadhav

पापुआ न्यू गिनीमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप

Patil_p

अमेरिकेत मोठा सायबर हल्ला; आणीबाणी लागू

datta jadhav

रशियाला युद्ध थांबवायला सांगा; युक्रेनचे भारताला आवाहन

Archana Banage

वायुदल प्रमुख 5 दिवसांच्या इजिप्त दौऱयावर

Patil_p

भारत वंशीय दोघांची बायडेन टीममध्ये वर्णी

Amit Kulkarni