Tarun Bharat

स्कायटच आनंद अकादमी,सिग्नेचर विजयी

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

नारीशक्ती व सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब आयोजित नरेंद्र कुलकर्णी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिग्नेचर संघाने एमसीसीसी अकॅडमी संघाचा तर स्कायटच आनंद अकादमी संघाने माळमारूती संघाचा पराभव केला. नियाज इनामदार (एमसीसीसी), रोहित पाटील (आनंद अकादमी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एमसीसीसी अकादमी संघाने 20 षटकात 7 बाद 108 धावा केल्या. त्यात नियाज इनामदारने 2 चौकारासह नाबाद 32, दादापिर हाजीने 3 चौकारासह 22 धावा केल्या, सिग्नेचरतर्फे विनायक सिद्धलिंगने 22 धावात 2 तर अमोल यल्लुप्पाचेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल सिग्नेचर संघाने 19.1 षटकात 8 बाद 111 धावा करून सामना 2 गडय़ानी जिंकला. त्यात संतोष चव्हाणने 2 षटकार, 4 चौकारासह 33 तर मधुसूदन कुलगोडने 3 चौकारासह 29 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे नियाज इनामदारने 14 धावात 5 तर आरिफ खानने 26 धावात 2 गडी बाद केले.

दुसऱया सामन्यात स्कायटच आनंद अकादमीने 20 षटकात 9 बाद 138 धावा केल्या. त्यात रोहित पाटीलने 2 चौकारासह 31 तर अभिषेक देसाईने 2 चौकारासह 16 धावा केल्या. माळमारूतीतर्फे रवी उपली, राहुल बजंत्री यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱया माळमारूती संघाचा डाव 12.5 षटकात 65 धावात आटोपला. त्यांच्या मुत्तूने 16 तर बसव पुजारीने 12 धावा केल्या. आनंदतर्फे रोहित पाटीलने 8 धावात 4 तर केतज कोल्हापुरेने 25 धावात 4 गडी बाद केले.

बुधवारचे सामने – 1) रॉजर सीसी वि. एक्स्ट्रीम सीसी, सकाळी 8.30 वा. 2) हिंडाल्को वि. एस. के. स्पोर्ट्स, दुपारी 12.30 वा.

Related Stories

मजगाव ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी प्राणप्रतिष्ठापना सोहळा 30 पासून

Amit Kulkarni

विजयनगर परिसरात मनोज पावशे यांच्यावतीने औषध वितरण

Patil_p

जिल्हय़ात कोरोनाची धास्ती वाढली

Patil_p

8 वाजताच वाजू लागले सायरन!

Amit Kulkarni

अतिक्रमण हटविण्यास गेलेले मनपा कर्मचारी रिकामी हाती परत

Patil_p

खासबाग येथील चौकात जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni