Tarun Bharat

`स्कूल कनेक्ट’ची `पॉलिटेक्निक’ला `पॉवर’!

अहिल्या परकाळे/कोल्हापूर

एकेकाळी पॉलिटेक्निकच्या कोर्सना प्रवेश मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती. पण गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानातील बदल आणि रोजगारच्या कमी झालेल्या संधी यामुळे पॉलिटेक्निकच्या कोर्सना अल्प, थंडा प्रतिसाद मिळू लागला. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी `स्कूल कनेक्ट’ प्रोग्रामी संकल्पना पुढे आली. ती यशस्वीरित्या राबविण्यात आली. त्यामुळे यंदा पॉलिटेक्निकच्या विविध कोर्संना पुन्हा पूर्वीप्रमाणे मोठा प्रतिसाद लाभताना दिसतो. कोरोनानंतर बदललेले जग आणि वर्क फ्रॉर्म होमच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रोजगारांच्या नवीन संधींमुळे पॉलिटेक्निकला चांगले दिवस आले आहेत.

पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाकडे दहा वर्षापूर्वी विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असायचा. त्यामुळे प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्याने अनेकांना प्रवेश मिळत नसे. पॉलिटेक्निकचा कोर्स पूर्ण करून असंख्य विद्यार्थी बाहेर पडत असत. पण त्या तुलनेत हळूहळू रोजगाराच्या संधी कमी झाल्या. परिणामी गेल्या तीन ते चार वर्षात पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणाऱयांची संख्या घटल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याने अनेक पॉलिटेक्निकना काही कोर्स बंद करावे लागले तर काहींची प्रवेश क्षमता देखील कमी करावी लागली. अशा वातावरणात काही पॉलिटेक्निक बंद करावी लागणार अशी स्थिती आहे.

स्कूल कनेक्ट प्रोग्रामची अंमलबजावणी

संकटाच्या स्थितीतून जाणाऱया पॉलिटेक्निकच्या कोर्सना वाचविण्यासाठी स्कूल कनेक्ट प्रोग्रामची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. पॉलिटेक्निकच्या अर्थात शासकीय तंत्रनिकेतन प्रशासनाने दहावीच्या विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रीत केले. शाळेत दहावीचे वर्ग सुरू असतानाच `स्कूल कनेक्ट प्रोग्रॅम’च्या माध्यमातून पॉलिटेक्निकमधील कोर्स, शिष्यवृत्ती, योजना आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी, स्वतःचा उद्योग उभा करण्याची संधी आदींचे महत्व पटवून दिले. सर्वसाधारणपणे पॉलिटेक्निकडे कल असणाऱया विद्यार्थ्यांचा संपूर्ण डाटा संकलित करण्यात आला. प्रवेश प्रक्रिया 30 जूनपासून सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना संपर्क साधून अर्ज भरण्यापर्यंत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रवेश क्षमतेपेक्षा जादा अर्ज

पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला दहावीची वाढलेली टक्केवारी आणि लांबलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया यांचा लाभ झाला आहे. अनेकांनी इतर शाखेऐवजी पॉलिटेक्निकच्या कोर्सला प्राधान्य दिले आहे. टक्केवारी वाढल्याने विद्यार्थ्यांना आपण कोर्स पूर्ण करू शकतो असा आत्मविश्वास वृद्धीगत झाला आहे. खासगी पॉलिटेक्निकला प्रवेश अर्ज कमी असले तरी शासकीय तंत्रनिकेतनकडे प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

 नोकरीची संधी वाढली

कोरोनामुळे `वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून नामांकीत कंपन्यांनीही विविध प्रोजेक्टसाठी ऑनलाईन इंटरव्हÎूच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच स्वत:चा व्यवसायही सुरू करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. परिणामी आपोआपच पॉलिटेक्निकमधील कोर्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.

जिल्ह्यात 20 पॉलिटेक्निक

कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय व खासगी 20 पॉलिटेक्निक आहेत. जिल्हÎातील सर्व पॉलिटेक्निकमध्ये 6600 विद्यार्थी क्षमता आहे. गतवर्षी अनेक जागा शिल्लक राहिल्या होत्या. यंदा मात्र आतापर्यंत 6 हजार अर्ज आले आहेत. गतवर्षी निम्यापेक्षा कमी अर्ज आले होते.

शासकीय तंत्रनिकेतनच्या उपक्रमाचा फायदा

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 660 जागा आहेत. गेल्या दोन वर्षात क्षमतेपेक्षा कमी अर्ज यायचे. यंदा मात्र 1 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. शासकीय तंत्रनिकेतनचा `स्कूल कनेक्ट’ उपक्रम चांगलाच उपयोगी पडला आहे. त्यामुळेच विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत झाली आहे.

डॉ. महादेव कागवाडे (शासकीय तंत्रनिकेतन )

Related Stories

कबनुरात कोरोनाने घेतला पहिला बळी, दोन रुग्णांची भर

Archana Banage

इंगवलेंवर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

Archana Banage

विसर्जन मार्ग उद्या `लॉकडाऊन’

Archana Banage

सडोली खालसा येथे एक महिला पॉझिटिव्ह

Archana Banage

बंदला आजर्‍यात प्रतिसाद 

Archana Banage

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रेरणा कोळी प्रथम

Archana Banage