Tarun Bharat

स्टार प्रवाहवर आता वेबसिरिजची मेजवानी

Advertisements

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. आज 13 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे ‘हॉस्टेजेस’ ही वेबसिरिज. जगभरात नावाजलेल्या या वेबसिरिजची हॉस्टेजेस ही भारतीय आवफत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसिरिजची निर्मिती केली आहे. खास बात म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेबसिरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे. सस्पेन्स थ्रीलर असणारी ही वेबसिरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारी आहे.

हॉस्टेजेस ही संपूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अशा डॉक्टरची जिच्यावर मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात येते. मात्र, शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच त्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचता कामा नये अशी अट त्या डॉक्टरसमोर ठेवण्यात येते. या द्विधा मनस्थितीत डॉक्टर आपल्या कर्तव्याला जागणार की कुटुंबाचा जीव वाचवणार याची उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे हॉस्टेजेस ही वेबसिरिज. टिस्का चोप्रा, रोनित रॉय, परवीन डब्बास यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये आहेत. सुधीर मिश्रा यांनी या वेबसिरिजचे दिग्दर्शन केले आहे.

Related Stories

रवि तेजाच्या चित्रपटात नुपुर सेनॉन

Patil_p

क्रिती सेननला बॉलिवूडमध्ये 7 वर्षे पूर्ण

Patil_p

स्वाभिमानमधील भूमिका म्हणजे ड्रीमरोल -पूजा बिरारी

Patil_p

‘आब्रा-का-डाब्रा’ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पाडणार भुरळ!

Patil_p

प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन

Abhijeet Shinde

डॉक्टर डॉनमध्ये दिसणार सागर कारंडे

Patil_p
error: Content is protected !!