Tarun Bharat

स्टेट बँकेची मेगा भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने येणाऱया काळात 8 हजार पदांवर उमेदवारांची मेगा भरती आयोजीत केली आहे. ज्युनियर असोसिएट पदांसाठी आपण जर का पात्र असाल तर 26 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतो.

एसबीआयने विविध राज्यांमध्ये ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदांवर वरील भरती आयोजीत केली आहे. सदर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतलेले असावे. राज्यांप्रमाणे भाषा येणाऱया उमेदवारांनी त्या त्या प्रांताकरीता अर्ज भरायचे आहेत. यासंदर्भात खालील संकेतस्थळावर सविस्तर जाणून घेता येतं.

उमेदवाराचे वय 20 वर्षापेक्षा कमी आणि 28 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. ही मयोमर्यादा 1 जानेवारी 2020 रोजी नुसार गणली जाईल. नियमानुसार इतर वर्गवारीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.

वेतन- विविध टप्प्यातून उमेदवाराची निवड केली जाणार असून निवडलेल्या उमेदवाराला 11 हजार 765 ते 31 हजार 450 रुपये वेतन मिळणार आहे.

निवड प्रक्रिया- ऑनलाइन टेस्ट हे एक माध्यम निवडीसाठी असणार आहे. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाणार असून भाषा परीक्षेतील कामगिरीचा विचार केला जाणार आहे.

परीक्षेचा तपशील- ऑनलाइन पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणार असून त्यात वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. एक तासाचा कालावधी पेपर सोडवण्यासाठी दिला जाईल. इंग्रजी 30, न्युमरिकल एबिलिटी 35 आणि रिजनल एबिलिटीसंबंधी 35 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराला एक गुण मिळेल. यानंतर मुख्य परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे.

अर्जाचे शुल्क- उमेदवारांना 750 रुपये शुल्क असणार असून एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांना शुल्क माफ आहे.

अर्ज कधी आणि कसा कराल- इच्छुक पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन दाखल करायचा आहे. याकरीता 26 जानेवारी 2020 ही शेवटची तारीख असणार आहे.

अधिक माहितीकरीता वेबसाइट- http://sbi.co.in

राज्यवार भरती

मध्य प्रदेश 510

बिहार 230

छत्तीसगड 190

उत्तर प्रदेश 865

राजस्थान 500

पंजाब 150

दिल्ली 143

उत्तराखंड 250

हरयाणा 97

चंदीगड 25

हिमाचल प्रदेश 185

जम्मू काश्मीर 50

झारखंड 45

Related Stories

2020 मध्ये तेजीची संधी ?

Patil_p

व्यावसायिक, अफोर्डेबल प्रकल्पांना वाव

Patil_p

मागणी घटली, किमतीवर वाढता दबाव

Patil_p

मल्लू

Patil_p

जुन्या कार्पेटच करायचं काय?

Patil_p

अपनाडॉटकोकडून होणार उमेदवारांची भरती

Amit Kulkarni