Tarun Bharat

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकयांचे बिघडले आर्थिक गणीत

वार्ताहर/ केळघर :

कोरोना’चा फटका जावळी तालुक्यातील जवळपास 300 एकरावरील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकयांना बसला असून कोरोनामुळे या शेतकऱयांचे   लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱयांचे आर्थिक गणितच बिघडून जाणार असून वर्षभर हमखास उत्पन्न मिळवून देणाया या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकयांचे कंबरडेच मोडले आहे.

दरवर्षी इटली,स्पेन, अमेरिका या देशातून स्ट्रॉबेरी ची मातृ रोपे (स्दूप ज्त्aहू)येतात.तालुक्यात जावळी तालुक्यात सर्वाधिक जवळजवळ 250एकरावर स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली जाते.तर तालुक्यातील इतर विभागात जवळपास 50  एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी ची लागवड केली जाते.ही रोपे परदेशातून येताना निर्जंतुकीकरण करण्यात येतात व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शेतकयांना देण्यात येतात.यावर्षी अमेरिका,स्पेन, इटली या देशात कोरोनाने कहर केल्याने मातृ रोपे येण्याची शक्यता खूपच कमी आहे.मातृ रोपे न आल्याने शेतकयांना स्ट्रॉबेरी ची लागवड करणे अवघड झाले आहे. साधारणपणे जून च्या पहिल्या आठवडय़ापासून स्ट्रॉबेरी रोपांची लागवड करण्यास सुरुवात होते.मात्र या वर्षी स्ट्रॉबेरी ची मातृ रोपे उपलब्ध न झाल्याने या शेतकयांचे मोठे नुकसान होणार आहे.ज्या शेतकयांकडे पाण्याची उपलब्धता होते त्यांच्याकडे स्ट्रॉबेरी या हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिकाचा पर्यायी मार्ग मिळाला होता.मात्र या वर्षी शेतकयांना कोरोनाचा मोठा फटका बसणार आहे.या शेतकयांना शासनाने दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

कोरोणाचा फटका या वर्षी तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकयांना बसला आहे.मातृ रोपे उपलबध न झाल्याने हे शेतकरी हवालदिल झाले असून या शेतकयांना नॅशनल हॉर्टि कल्चर संस्थेकडून आर्थिक मदत मिळणे आवशयक आहे-

आदिनाथ ओंबळे- अध्यक्ष ,श्रमिक जनता विकास संस्था.

Related Stories

जिल्हय़ात बाधित वाढी 50 खाली आल्याचा दिलासा

Patil_p

नव्या मासेमारी नियंत्रण कायद्याला स्थगिती द्या!

Patil_p

राष्ट्रीय पातळीवर ऍड. वर्षा देशपांडे यांची नियुक्ती

Amit Kulkarni

सातारा : जिल्हा परिषदेत 32 जणांना पदोन्नती

datta jadhav

गोडोलीकरांना नव्या संसर्गाची धास्ती

Archana Banage

सातारा : अवैध धंद्यांविरोधात बोरगाव पोलिसांची कारवाई

datta jadhav