Tarun Bharat

स्थलांतर थांबवायचे असेल तर बोंडारवाडी धरण झालेचं पाहीजे

प्रतिनिधी/ मेढा

     जावली तालुक्यात रोजगार नाही. , शेतील पाणी नाही ,. उपजीविकेचे साधन नसल्यामुळे मोठया प्रमाणात युवक वर्गाच स्थलांतर शहराकडे होवू लागल्याने खेडी ओस पडू लागली आहेत .बोंडारवाडी धरण लवकरात लवकर झाले तर बागायती क्षेत्राच्या वाढीबरोबरचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी केले.

      मेढा येथील भैरवनाथ मंदिरामध्ये मोर्चाच् नियोजनासाठी आयोजीत केलेल्या बैठकिप्रसंगी श्री मोकाशी बोलत होते .ते पुढे म्हणाले 54गावासाठी पिण्यासाठी व शेतीसाठी असणारे हे धरण असून 10 हजार कुटुंबांना 1600 शेघन मिटरप्रमाणे पाणी 6 टक्के पाणी क0हेर धरणातून वापरण्याचा अधिकार असताना . आम्ही ते अद्याप वापरले नाही. असे असताना बोंडारवाडी धरणाला विलंब होत असताना ’ मात्र औंध व 16 गांवाना क0हेर मधून सिंचनासाठी पाणी देण्याबाबत शासनाचा निर्णय झाला . त्याला कुठल्याच लोकप्रतिनिधींनी विरोध केला नाही. मात्र आमचं हक्काच पाणी आम्हाला मिळत नाही तो पर्यंत बोंडारवाडी धरण कृती समितीचा शासनाच्या निर्णयाला विरोध राहाणार असल्याचे जाहीर केले.

        यावेळी आदिनाथ ओंबळे, विलासबाबा जवळ यांनी ही आपल्या मनोगतातून , 12 वर्ष लढा सुरु असणारे बोंडारवाडी धरण हे झालेच पाहीजे , त्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबरच , कृषी पर्यटनाची वाढ होणार आहे. तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटणार असल्याचे सुचित केले.

      या बैठकिला धरण कृती समितीचे विजयराव मोकाशी ,राजेंद्र धनावडे, अशोक पार्टे, जगन्नाथ जाधव, सुरेश कासुर्डे , विलास शिर्के, दिपक मोरे , यशवंत बेलोशे , जगन्नाथ पार्टे , आदिनाथ ओंबळे, राजेंद्र जाधव, जे.टी. पवार, यांच्यासह मेढय़ाचे माजी सरपंच बबनराव वारागडे, डॉ. संपतराव कांबळे, नारायण शिंगटे , शिवाजी देशमुख, सुरेश पार्टे, प्रकाश कदम, विलास बाबा जवळ, संजय सुर्वे,संतोष वारागडे, किसनराव जवळ , सचिन जवळ , संजय सपकाळ, इम्रान आतार , आदी उपस्थित होते. नारायण शिंगटे ,यांनी स्वागत, शिवाजी देशमुख, यांनी प्रास्ताविक , तर सुरेश पार्टे यांनी आभार मानले.

Related Stories

…तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका

Archana Banage

‘लम्पी’ने जनावरे दगावणार नाहीत याची दक्षता घ्या

Archana Banage

आज ठरणार गावकारभारी

Patil_p

शाहूपुरी पाणी योजनेसाठी आमदार शिवेंद्रराजेंना साकडे

Omkar B

”ओबीसींना कशाच्या आधारे वैद्यकीय प्रवेशात 27 टक्के आरक्षण दिलं?”

Archana Banage

आरटीओ आवारातून वाहन पळवून नेणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!