Tarun Bharat

स्थायी समितीच्या सभेच्या अजेंड्यावर 350 विषयांची रेलचेल

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

कोरोनामुळे सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा होत नव्हती. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सभेला उद्याचा
(दि. 27) मुहूर्त लागला. सभा ऑनलाईन असल्याने सभेत आवाज म्युट होण्याची भिती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या सभेला 350 विषय घेण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विषय मंजूर होणार परंतु त्यावर चर्चा मात्र अर्धवट राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सातारा पालिकेच्या स्थायी समितीमध्ये सर्व पदाधिकारी, विरोधी गटातील केवळ अशोक मोने यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेमध्ये महत्वाच्या विषयांना मंजूरी दिली जाते. अंजेडा समितीतील सदस्यांना वाटप करण्यात आला. सभेचा अजेंडा पाहिला असता त्यावर 314 विषयांचा उल्लेख असून ऐनवेळचे विषय पकडून असे 350 विषय आहेत. यामधील बुहतांशी विषय हे यापूर्वी कामे झाली आहेत. दरम्यान, नगरसेवक आपला विषय डावलला तर नाही ना याची खात्री करण्यासाठी विषय पत्रिका पाहून अभ्यास करत आहेत.

Related Stories

ब्युटी पार्लर विश्वातील अग्रगण्य नाव स्वाती ओक

datta jadhav

जिह्यातील सतरा पोलीस झाले फौजदार

Omkar B

व्यापाऱयांचा विरोध पण लॉकडाऊन सुरुच

Patil_p

एमआयडीसीतील चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

datta jadhav

आरोग्य विभागाचे कारभारी बदलणार

Patil_p

सातारा तालुक्यात बाधितांचा आकडा वाढताच

Abhijeet Shinde
error: Content is protected !!