Tarun Bharat

स्पायडर मॅन नो वे होम’चा ट्रेलर प्रदर्शित

Advertisements

स्पायडर मॅन नो वे होम चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेर त्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यापूर्वी ट्रेलर सोशल मीडियावर कथिरितत्या लीक झाला होता. नवीन ट्रेलरमध्ये टॉम हॉलंड स्पायडर मॅनच्या भूमिकेत मल्टीव्हर्सच्या खलनायकांशी लढताना दिसून येतो. टॉम हॉलंडचा स्पायडर मॅन म्हणू हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

3.03 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये टॉम हॉलंड मुख्य भूमिकेत आहे. पीटर पार्कर नवीन ट्रेलरमध्ये प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी पळून जाताना दिसून येते. जेमी फॉक्सचे इलेक्ट्रो आणि अल्प्रेड मोनिलनाचे डॉक्टर ऑक्टोपस या व्यक्तिरेखा चित्रपटामधून परतत आहेत. स्पायडर मॅन नो वे होमचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. युटय़ूबवर आतापर्यंत 1.4 कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. तर ट्विटरवर देखील याच्याशी संबंधित हॅशटॅग अग्रस्थानी ट्रेंड करत आहे.

Related Stories

ब्रूस ली-चॅकी जेनच्या पंक्तीत विद्युत जामवाल

Patil_p

संस्कृत असावी राष्ट्रीय भाषा

Patil_p

तू इथे जवळी राहा म्युझिक व्हिडिओत यशोमान आपटे, ज्ञानदा रामतीर्थकर

Patil_p

‘हाउस ऑफ द ड्रगन’चा ट्रेलर सादर

Patil_p

इन्स्टावर देसीगर्लची कोटींची उड्डाणे

Patil_p

‘इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहा’, सोनम कपूरचा देशवासीयांना सल्ला

tarunbharat
error: Content is protected !!