Tarun Bharat

स्पीकरची परवानगी कोणी दिली ; भाजपच्या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव यांचा आक्षेप

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तालिका अध्यक्षांच्या चेंबर आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामुळ तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ बड्या आमदारांना १ वर्षांसाठी निलंबीत केलं आहे. याचा निषेध करत भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारच्या कामाचा धिक्कार असो असा नारा दिला आहे. विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली आहे. भास्कर जाधव यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेवर आक्षेप घेतला आहे. विधीमंडळ परिसरात खासगी पत्रक वाटण्याचा आणि अशाप्रकारे जमाव करुन स्पीकर लावून भाषण करण्याचा अधिकार आणि परवानगी कोणी दिली. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना चौकशी करण्याची विनंती केली आहे.

पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते आणि सदस्य बसले आहेत. त्या बसण्याला विरोध नाही परंतु त्यांच्याकडे स्पीकर आहे आणि ते भाषण करत आहेत. त्यांना अशा प्रकारची स्पीकरची परवानगी दिली आहे का? ही परवानगी दिली असेल तर त्याबाबत स्पष्टता द्या, अन्यथा ज्यांनी स्पीकर दिला असेल त्यांच्यावर कारवाई करा, विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांना बोलवले आणि त्यांना कारवाई करण्यास सांगितले तर कारवाई केली नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

सभागृहाकडून विरोधी पक्षनेत्यांना पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्याची परवानगी दिली नाही. तसेच भाषण करण्यासाठी स्पीकर लावण्याची परवानगीही दिली नव्हती त्यामुळे ही परवानगी कोणी दिली आणि कोणाच्या परवानगीने भाजप नेत्यांनी प्रतिविधानसभा भरवली याबाबत चौकशी करण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी केली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी माईक जप्त करण्याच्या सूचनाही विधानसभा उपाध्यक्षांनी दिल्या आहेत.

Related Stories

WHO गुजरातमध्ये ग्लोबल सेंटर उभारणार

Archana Banage

पाकिस्तानला मराठी शिकवणाऱया पुराणिकांचा गोजमगुंडे यांच्याकडून सत्कार

Amit Kulkarni

शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, उगाचं फुकटचं श्रेय घेऊ नका…;राज ठाकरे

Abhijeet Khandekar

संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा साजरा

Patil_p

मध्य प्रदेश : विवाह समारंभात पोहोचला कोरोनाबाधित व्यक्ती; 86 जणांना केले क्वारंटाइन

Tousif Mujawar

सातारा जिल्हा परिषदेमध्ये लसीकरण झालेल्याच नागरिकांना प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!