Tarun Bharat

स्पुटनिक लस भारतात पोहचली; पुढील आठवड्यापासून होणार बाजारात उपलब्ध

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल. रशियातून आता ज्या काही मर्यादित लसींचे डोस मिळाले आहेत, त्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे.

डॉ. व्हीके पॉल म्हणाले, स्पुटनिक लस भारतात पोहोचली आहे. मला हे सांगण्यात आनंद आहे की, पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. रशियाकडून मर्यादित प्रमाणात आलेल्या लसीची विक्री येत्या आठवड्यापासून सुरू होईल.

भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये 216 कोटी लसींचं उत्पादन भारतीय नागरिकांसाठी केलं जाईल, अशी माहिती देखील वी के पॉल यांनी दिली. लवकरच सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्न व औषध प्रशासनानं परवानगी दिलेली लस भारतात आणता येईल. मात्र, यासाठी आवश्यक असणारा परवाना येत्या 1ते 2 दिवसामध्ये दिला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

जैव तंत्रज्ञान विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर विभाग हे फायजर, मॉडर्ना , जॉनसन अँड जॉनसन या कंपन्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी अधिकृतपणे भारतात कोरोना लसी पाठवणे किंवा उत्पादित करण्याविषयी कळवलं आहे. आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहे. भारतातल्या कंपन्यांच्या सहकार्यानं लसनिर्मिती करण्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो, असं वी.के.पॉल म्हणाले.

Related Stories

लालपरी सुसाट; दीड महिन्यात 521 कोटींची कमाई

datta jadhav

राहुल गांधींकडून देशाचा अपमान ः उपराष्ट्रपती

Patil_p

घरचा चहा, प्रसिद्ध ब्रँड्सना टक्कर

Patil_p

राजस्थान : 24 तासात दुसऱ्यांदा बिकानेरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

Tousif Mujawar

Kolhapur; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

Abhijeet Khandekar

”थोडी जरी शिल्लक असेल तर केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी”

Archana Banage