Tarun Bharat

‘स्पुटनिक-व्ही’ची किंमत प्रतिडोस 995 रुपये

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजची घोषणा- भारतात लसनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू

हैदराबाद / वृत्तसंस्था

भारतात कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर आता ‘स्पुटनिक-व्ही’ ही लसही उपलब्ध होणार आहे. भारतात ‘स्पुटनिक-व्ही’ची आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लसीची किंमत 995 रुपये जाहीर केली आहे. या लसीच्या एका डोसची किंमत 948 रुपये असून त्यावर 5 टक्के जीएसटी आकारल्यामुळे एकंदर किंमत 995 रुपये इतकी होते.

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात पोहोचली होती. दुसरी खेप येत्या एक-दोन दिवसात भारतात दाखल होणार आहे. 13 मे रोजी सेंट्रल ड्रग्ज रेग्युलेटरीकडून या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. देशातील सहा कंपन्यांशी स्पुटनिक लस भारतातच बनविण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही लस रशियातून आयात केलेली असल्यामुळे सध्या किंमत अधिक वाटत असली तरी भारतात या लसीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर तिची किंमत कमी होऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

दिपक सापरा यांनी घेतला ‘स्पुटनिक’चा पहिला डोस

डॉ. रेड्डीज लॅबने शुक्रवारी हैदराबाद येथील व्यक्तीला पहिला डोस देत ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे लाँचिंग केले. ही लस भारतात सर्वात पहिल्यांदा दिपक सापरा यांना टोचण्यात आल्याचे अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर करण्यात आले आहे. सापरा हे रेड्डीज लॅबच्या कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड आहेत. रशियाची ही लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासही मदत होणार आहे.

Related Stories

लसीकरणाबाबत शंका-कुशंका नको!

Patil_p

सांबामध्ये संशयित ड्रोनच्या घिरट्या

datta jadhav

औषध निर्मितीचा वेग वाढणार

Amit Kulkarni

रिलॅक्सो फुटवियर्सला 102 कोटींचा नफा

Patil_p

दहावीचा निकाल २० जुलैला – सीबीएसई बोर्डाचा निर्णय

Archana Banage

येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना देणार Zycov-D लस

Tousif Mujawar