Tarun Bharat

‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप उद्या भारतात पोहचणार

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

स्पुटनिक व्ही या लसीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली होती. आता या लसीची दुसरी खेप उद्या भारतात दाखल होणार आहे. भारतात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लसीला केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. काही राज्यांनी तर १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण बंद केलं आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा वाढण्याची मागणी होत आहे. त्यातच आता रशियातून स्पुटनिक व्ही लसीची दुसरी खेप उद्या भारतात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला वेग येईल असे सांगण्यात येत आहे.



स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती. ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लसीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.

Related Stories

मेदव्हेदेव, सित्सिपस, किज, क्विटोव्हा उपांत्य फेरीत

Patil_p

यंदा मंत्र्यांनी नवी वाहने खरेदी करू नये : योगी आदित्यनाथ

datta jadhav

देशात 2 लाखांहून अधिक कोरोनामुक्त

Patil_p

उत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या

prashant_c

मान्सूनसरींची आनंदवार्ता ! १० दिवस आधीच मान्सून धडकणार

Rahul Gadkar

संरक्षण सहकार्य बळकट करणार भारत अन् जपान

Patil_p
error: Content is protected !!